नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं असतानाच पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले, त्याचप्रमाणे या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


दरम्यान ही बातमी ऑनलाईन माध्यमात चर्चेत आहे, आमच्या प्रतिनिधीने दिलेली नाही.


दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं. या शवविच्छेदन अहवालानुसार, "पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे." तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता, असं अहवालात नमूद केलं आहे. दरम्यान या प्रकरणी FSL (फोर्स्ड सेक्शुअल इंटरकोस) चा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.


वारंवार गळा दाबल्याने मणका मोडला, हेच तिच्या मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं अहवालात म्हटलं आहे. याआधी अलिगडच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजच्या अहवालातही मणका मोडल्याचा उल्लेख होता. गळा दाबल्यामुळे सर्वायकल स्पाईनचा लिगामेंट तुटला. या अहवालातही बलात्काराचा उल्लेख नव्हता.


शवविच्छेदन अहवालात काय म्हटलं?
- बलात्काराचा उल्लेख नाही
- पीडितेच्या मणक्याला दुखापत
- तरुणीच्या मानेलाही दुखापत
- पीडितेला हार्ट अटॅक आला होता होता
- पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं होतं
- 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू


14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास
14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.


SIT कडून प्रकरणाचा तपास
हाथरस बलात्कार प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. यमुना एक्स्प्रेसवर ताफा अडवल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पायी हाथरसच्या दिशेने रवाना झाले आहेत. पीडितेच्या मृत्यूनंतर रोष वाढल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्‍यीय एसआयटीची स्थापना केली आहे. सोबतच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे निर्देशही दिले आहेत.


संबंधित बातम्या