एक्स्प्लोर

मोदींच्या मनात काय? भाजपकडून खासदारांना व्हिप जारी, संसदेत आज काय होणार?

भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे. सर्व खासदारांनी चर्चेसाठी उपस्थित राहून सरकारला पाठिंबा द्यावा, असा आदेश भाजपने या तीन ओळींच्या व्हिपमध्ये दिला आहे.

नवी दिल्ली : आज सगळ्यांच्याच नजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत. मात्र त्याच वेळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील हालचालीही वाढल्या आहेत. भाजपने सोमवारी (10 फेब्रुवारी) रात्री उशिरा आपल्या राज्यसभा खासदारांना व्हिप जारी केला आहे. या व्हिपनंतर सोशल मीडियावर शंका, अंदाज, चर्चांना उधाण आलं आहे. तसंच विविध अटकळ बांधल्या जात आहेत. समान नागरी विधेयकापासून दिल्लीसंदर्भात काही मोठ्या निर्णयाबाबत चर्चा सुरु झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. आजच अर्थमंत्री निर्मला सीतारमण दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देतील. त्यातच भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे, ज्यात सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. यंदा अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार संसेदत अर्थ विधेयक सादर करणार आहे. सोशल मीडियावर अटकळ रात्री उशिरा भाजपचा व्हिप समोर येताच नेटकरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आणि विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसात जेव्हा भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला होता, तेव्हा मोठा निर्णयांची घोषणा झाली होती. मग जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो किंवा राम मंदिरच्या ट्रस्टच्या नावाची घोषणा असो, केंद्र सरकारने निर्णय जाहीर केले होते. याशिवाय नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या वेळीही असंच काहीसं घडलं होतं. ट्विटरवर नेटकरी काय बोलत आहेत? भाजपने व्हिप जारी केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली. त्यामध्ये पहिला मुद्दा 'यूनिफॉर्म सिविल कोड' म्हणजेच 'समान नागरी कायदा' हा आहे. सोशल मीडियावर एक कागदपत्र व्हायरल होत आहे, जे संसदेच्या कामकाजातील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात समान नागरी विधेयक 2020 चा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय दिल्लीच्या सीमेत बदल होण्याची शक्यताही सोशल मीडियावर वर्तवली जात आहे. यात सीमाभागातील काही क्षेत्र उत्तर प्रदेशात विलीन करणं, विधानसभा नसलेल्या केंद्रशासित लडाखप्रमाणे दिल्लीचा रचना करणं, अशीही चर्चा आहे. मात्र या केवळ अटकळ आहेत. सरकार किंवा पक्ष कोणीही याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत कोणी दुजोरा देत नाही, तोपर्यंत या शक्यतांवर लक्ष न देणंच योग्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget