BJP Foundation Day : देशातला सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजपचा (BJP) 6 एप्रिलला स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त भाजपकडून जोरात तयारी सुरू आहे. स्थापना दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. भाजप नेते अरूण सिंह यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली आहे.
स्थापना दिनाच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना अरूण सिंह म्हणाले, देशातील भाजपच्या सर्व शाखेच्या कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येईल. कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, आमदार सहभागी होणार आहे. भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात भाजप अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यातच आली आहे.
तसेच भाजप पक्षाकडून स्थापना दिनाच्या निमित्ताने 7 ते 20 एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहेय या पंधरवड्यात केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. 12 एप्रिला लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 13 एप्रिलला गरीब कल्याण अन्न योजना देशभरात राबवण्यात येणार आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक कार्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अरूण सिंह म्हणाले, 15 एप्रिलला अनुसुचित जातींच्या विकासासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांना भाजपचे कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :