Setback For Donald Trump:  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास बंदी घालण्यात आली होती. या संदर्भातील  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतील बोस्टन न्यायालयानं स्थगितीदिली आहे. या प्रकरणी हार्वर्डकडून नाराजी व्यक्त करत या प्रकरणी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.   

शुक्रवारी (23 मे 2025 ) रोजी बोस्टनच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर घालण्यात आलेली बंदी अमेरिकन संविधान आणि इतर संघराज्यीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं.  याशिवाय विद्यापीठ आणि 7 हजारांहून व्हिसा धारकांवर याचा तात्काळ आणि वाईट परिणाम होईल असं म्हटलं. हार्वर्ड नं म्हटलं की सरकारनं एका पेनाच्या सहाय्यानं हार्वर्ड च्या एक चुतर्थांश विद्यार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत जे विद्यापीठ आणि त्याच्या मिशनमध्ये योगदान देतात. 

न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

जगातील जुन्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ असलेल्या हार्वर्डनं म्हटलं की, "आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याशिवाय हार्वर्ड , हार्वर्ड राहणार नाही. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेल्या अमेरिकेच्या  जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती एलिसन बरोज यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाला स्थगिती दिली आहे. हार्वर्ड विद्यापीठानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. विद्यापीठानं त्यांना मिळणाऱ्या 3 अब्ज डॉलर रकमेच्या अनुदानासाठी याचिका दाखल केलेली . यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा स्टे आहे.  

डोनाल्ज ट्रम्प यांना कुणाचं समर्थन

या दरम्यान, पॉल, वीस आणि स्कॅडेन आर्प्स या सारख्या कायदेशीर फर्म ट्रम्प यांच्या समर्थनार्थ दिसून आल्या. मोफत कायदेशीर सेवा देण्यावर सहमती दिली. बरोज च्या निर्णयानंतर एका वक्तव्यात व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगैल जैक्सन यांनी हा मुद्दा फेटाळून लावला. 

जर हार्वर्ड मध्ये अमेरिका विरोधी, यहूदी विरोधी आणि दहशतवादी समर्थक आंदोलकांच्या संकटाला समाप्त करण्याची इतकी तळमळ असती तर ते या स्थितीत नसते. हार्वर्डला त्यांचा वेळ त्यांच्याकडील साधन आणि वातावरण सुरक्षित करण्यासंदर्भात खर्च केला पाहिजे.नाकी गुन्हे दाखल करावेत, असं अबीगैल जैक्सन यांनी म्हटलं.