Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी आणि नफ्ताली बेनेट यांच्यातील चर्चेदरम्यान जागतिक मुद्यांवर चर्चा झाली. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायलमधील अनेक क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. "नफताली बेनेट यांच्याशी बोलून आनंद वाटला. आम्ही अलीकडील जागतिक घडामोडींवर चर्चा केली आणि अनेक क्षेत्रांमध्ये भारत-इस्त्रायल सहकार्याचा आढावा घेतला. मी लवकरच त्यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहे, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.   






बेनेट यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बेनेट यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलही पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, या पूर्वी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की या दोघांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता.


दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचेही स्वागत केले होते. शिवाय  या चर्चांमुळे दोन्ही देशातील संघर्ष संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली होती. शिवाय बेनेट यांना युद्धाच्या काळात शांतता निर्माण करणारे म्हणून देखील पाहिले गेल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्या