एक्स्प्लोर

राज्यसभेसाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल तर, भाजपकडून उदयनराजे, रामदास आठवलेंना उमेदवारी जाहीर

राज्यसभेसाठी महाविकास आघाडी तर्फे शरद पवार यांनी आज अर्ज भरला आहे. तर, भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर झालीय.

नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून राज्यसभेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्रातून ही दोन नावं राज्यसभेत जातील. तर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचा सस्पेन्स कायम राहिला आहे. शिंदे आजच भाजपवासी झाले आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडी ठरवेल, सोनिया गांधींच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरांताचा राष्ट्रवादीला इशारा महाविकास आघाडीतून शरद पवार यांचा अर्ज राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या अनेकांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडीची अतिरिक्त एक जागा कोण लढवणार हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचा प्रमुख प्रश्न आहे. राष्ट्रवादीने यावर दावा केलेला असला तरी आज सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनीही राष्ट्रवादीला सूचक इशारा दिलेला आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. फौजिया खान यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. तर भाजपकडून महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसलेंचं नावं जाहीर करण्यात आलंय. Rajya Sabha Election | राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपची बैठक राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी बैठक पार पडली. राज्यसभेवर भाजपच्या तीन जागा निवडून जाऊ शकतात. त्यातल्या तिसऱ्या जागेवर भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. याआधीच भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचं नाव निश्चित झालं होतं. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलंय. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचा सस्पेन्स कायम राहिला आहे. Rajyasabha Election | एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेस अडली

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?

व्हिडीओ

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget