एक्स्प्लोर
Advertisement
LIVE UPDATE : आर्थिक मागास सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर
सगळ्या खासदारांना तीन पानी विधेयकाची प्रत दिली असून संध्याकाळी पाच वाजल्यापासून विधेयकावर चर्चा सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : 124 व्या घटनादुरुस्ती विधेयक, 2019 (खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण विधेयक) आज लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी विधेयक मांडलं. सगळ्या खासदारांना तीन पानी विधेयकाची प्रत दिली असून संध्याकाळी पाच वाजल्यापासून विधेयकावर चर्चा सुरु होणार आहे.
थावरचंद गहलोत यांनी सभागृहात विधेयक मांडताच समाजवादी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप नोंदवत गोंधळ घातला. परंतु लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांचा आक्षेप फेटाळला.
संविधानातील ही 124वी दुरुस्ती आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. लोकसभेत भाजपने आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. सोबतच राज्यसभेचा कार्यकाळही एक दिवसाने वाढवण्यात आला आहे.
घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. नंबर गेमनुसार लोकसभेत सरकार आवश्यक आकडे नसूनही विधेयक मंजूर करु शकतं. पण राज्यसभेत काँग्रेस, आप आणि बसपाचं समर्थन असूनही विधेयक रखडू शकतो. इतकंच नाही तर 50% राज्य विधानसभांचीही सहमती गरजेची आहे.
LIVE UPDATE
- आर्थिक मागस सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर
- हे विधेयक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे : असदुद्दीन ओवेसी
- खुला प्रवर्ग आर्थिक मागास आरक्षण संविधानाची फसवणूक आहे : असदुद्दीन ओवेसी
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास आरक्षणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा : सुप्रिया सुळे
- लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा स्टंट आहे : भगवंत मान
- आरक्षणाबाबत भाजपच्या मनात खोट : भगवंत मान
- सरकारच्या निर्णयाने आनंदी, सर्वांना समान संधी मिळायल्या हव्या : रामविलास पासवान
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांच्या आरक्षणाला साडेचार वर्ष का लागली? : शिवसेना
- अर्थमंत्री अरुण जेटली
- कम्युनिस्ट पक्षाने विधेयकाला विरोध केल्यास, एखाद्या गरीबांच्या हिताच्या गोष्टीला डाव्यांनी विरोध केल्याचं हे पहिलं उदाहरण ठरेल : जेटली
- आरक्षण गरीबांना, मग कम्युनिस्टांचा विरोध का? : जेटली
- खासगी संस्थांमध्येही गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण : जेटली
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास आरक्षणाला राज्यांच्या मंजुरीची गरज नाही : जेटली
- सर्वांना समान संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न : जेटली
- अनारक्षित गरीबांना आरक्षणाचं आश्वासन सध्याच्या विरोधी पक्षानं दिलं होतं : जेटली
- जुमल्याची सुरुवात विरोधकांनी केली, घोषणापत्रात आरक्षणाचा उल्लेख होता : जेटली
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास आरक्षणावर आजवर प्रयत्न झाले नाहीत : अरुण जेटली
- मागील सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांच्या आरक्षणासाठी प्रयत्न नाही केले : जेटली
- खासगी संस्थांमध्येही आरक्षणाचा प्रस्ताव : जेटली
- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत
- सर्व धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण : गहलोत
- पटेल, जाट, मुस्लीम, ख्रिश्चन, ब्राह्मणांना मिळणार लाभ : गहलोत
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ, सबका विकास केला : गहलोत
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणानं इतर आरक्षणांना धक्का बसणार नाही : गहलोत
- खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांच्या आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू
- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण विधेयक लोकसभेत सादर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
लातूर
मुंबई
Advertisement