एक्स्प्लोर
...तर आम्हीही राजीनामा देऊ, राजद नेत्यांचा निर्धार
पाटणा : बिहारच्या राजकारणात सध्या युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्यावर फैसला करण्यासाठी नितीश कुमार यांनी बैठक संपली आहे. मात्र, यामध्ये काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, महागठबंधन असंच सुरु राहिल, असं तेजस्वी यादव यांनी बैठकीनंतर सांगितलं.
भाजप समर्थकांकडून ही खेळी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत नितीश कुमार यांनी तेजस्वी यांच्या राजीनाम्यावर 4 दिवसात निर्णय घेण्याचं अल्टीमेटम दिलं होतं. तर दुसरीकडं लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेजस्वी कोणताही राजीनामा देणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता नितीश कुमार तेजस्वी यांना बरखास्त करतात का, याकडे संपूर्ण बिहारचं लक्ष लागलं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू प्रसाद) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्यामुळे नितीश कुमार सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे तेजस्वी यांना राजीनाम्याची मागणी केल्याचं बोललं जातं आहे. मात्र, तिकडे लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नितीश कुमार तेजस्वी यांना बरखास्त करतात का, याकडे संपूर्ण बिहारचं लक्ष लागलं आहे.
यासंपूर्ण पाश्वर्भूमीवर नितीश यांनी कॅबिनेटची बैठक बोलवली आहे. ज्यामध्ये महायुतीला सोबत घेऊन सरकार चालवणारे नितीश कुमार उपमुख्यमंत्री तेजस्वी यांचं प्रकरण कसं हाताळायचं, हे ठरण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
भारत
Advertisement