एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार योग्य उमेदवार : शरद पवार

नवी दिल्ली :  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. इतकंच नाही तर आगामी काळात भाजपचा वारु रोखण्यासाठी, भाजपविरोधी पक्ष एकत्र आल्यास, नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असं पवार यांनी म्हटलं आहे.   याशिवाय भाजपविरोधात जर विरोधी पक्ष एकत्र येत असतील, तर त्याला राष्ट्रवादीचाही पाठिंबा असेल, असंही पवारांनी घोषीत केलं.   "आगामी काळात भाजपचा वारु रोखण्यासाठी, भाजपविरोधी पक्ष एकत्र आल्यास, त्याची धुरा सांभाळण्यासाठी नितीश कुमार प्रमुख दावेदार असतील. येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमारच पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील. कारण संघटीत विरोधी पक्षांमध्ये नितीश कुमार हा एकमेव पात्र चेहरा आहे", असं पवार म्हणाले.   इंग्रजी वृत्तपत्र 'द इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पवारांनी आपलं मत मांडलं.   पवार म्हणाले, "भारतात आज जर विरोधी पक्षांना एकत्र येऊन, काही पर्याय द्यायचा असेल, तर त्यांच्यासमोर नितीश कुमार हे पहिलं नाव आहे. काँग्रेसकडे तसा चेहरा नाही. नितीश कुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे तसं नेतृत्व आहे.  जर भाजपविरोधी पक्ष एकत्र आले, तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल".   लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करुन निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे केवळ चारच खासदार निवडून आले. तर महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ दोन जागांवरच समाधान मानावं लागलं होतं.   तर तिकडे नितीश कुमार यांनीही भाजपची साथ सोडून एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली होती. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले.   मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातून सत्तेतून पायउतार झाली. तर तिकडे नितीश कुमार यांनी लालूंच्या साथीने बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करून, भाजपचा विजयाचा वारू रोखला.   पवार नितीश कुमारांचे प्रशंसक   शरद पवार हे नितीश कुमारांचे पूर्वीपासूनचे प्रशंसक आहेत. विधानसभा निवडणुकीत नितीश-लालू यांचाच विजय होईल, असा विश्वास पवारांनी त्यावेळी व्यक्त केला होता.   त्यामुळे पवारांनी नितीश कुमारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.   सोनियांचंही कौतुक   दुसरीकडे पवारांनी सोनिया गांधींचंही कौतुक केलं आहे. विरोधी पक्षांमध्ये सोनिया गांधी सर्वमान्य नेत्या आहेत. सोनियाही सर्वांन सोबत घेऊन जाणाऱ्या आहेत, असं पवार म्हणाले.   राहुल गांधींबाबत   यावेळी शरद पवारांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत अधिक बोलणं टाळलं. राहुल गांधी सध्या विविध राज्यांचा दौरा करत आहेत, इतकंच बोलून पवारांनी विषय टाळला.   मायावतींना विजय मिळेल   उत्तर प्रदेशात 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्वास यावेळी पवारांनी व्यक्त केला.   केजरीवालांचं केवळ नाव ऐकलं शरद पवारांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. पवारांनी अरविंद केजरीवाल यांना नाकारून, केजरीवालांना कोणीही ओळखत नाही, केवळ त्यांचं नाव ऐकलंय, असं पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget