एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे
जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात एका महिलेने 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'चे नारे दिले आहेत. ही महिला एक काश्मीरी पंडित असल्याचं सांगितलं जात असून, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात एका महिलेने 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'चे नारे दिले आहेत. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, स्वातंत्र्यदिनी अनेक दिग्गज कलाकार आणि खेळाडूंनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरु पोस्ट केला आहे.
हा व्हिडीओ कोणत्या दिवशीचा आहे याची माहिती नसली, तरी ही महिला अचानक श्रीनगरच्या लाल चौकात दाखल झाली. तिने तिथे बंदोबस्तासाठी तैनात सुरक्षा रक्षकांसमोर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. ही महिला एक काश्मीरी पंडित असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी आलेल्या 200 भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी हिजबुलचा कमांडर बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वारंवार उफाळून येत आहे. अशा परिस्थितीत या महिलेने लाल चौकात येऊन, 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'चे नारे लावत आहे.
नेटीझन्सकडून या महिलेचा व्हिडीओ ट्रेण्डिंगमध्ये आहे. हा व्हिडीओ अभिनेते अनुपम खेर, क्रिकेटपटू सुरेश रैना आदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.
90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडितांच्या पलायनानंतर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला काश्मीरमध्ये कडक सुरक्षा ठेवली जाते. वर्तमान स्थितीत लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्याचा कुठलाही कार्यक्रम असल्यास सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान असते.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement