हैदराबादच्या भारत बायोटेक (Bharat Biotech) या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे. कोवॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती. ही लस भारत बायोटेक सोबत आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने एकत्रित रित्या बनवली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोवॅक्सिन लसीला परवानगी दिली होती, त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते. 


भारत बायोटेकचं संशोधन आणि निर्मिती असलेल्या या लसीला जागतिक आरोग्य संघटेनची परवानगी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोवॅक्सिन लस घेतलेली असेल तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर कॉरंटाईन नियमाचे पालन करावे लागत असे. डब्लूएचओची मान्यता मिळाल्यामुळे आता हा द्रविडी प्राणायम वाचणार आहे.


Vaccination : ‘कोव्हिशील्ड’वाले आणि ‘कोवॅक्सिन’वाले; देशात दोन नवे वर्ग, केरळ उच्च न्यायालयाची टिपण्णी



ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. दरम्यान, कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराबाबतच्या संमतीसाठी तज्ज्ञ समितीकडून शिफारसही करण्यात आली होती. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. 



Covaxin approved by Australia govt : दिलासादायक ! ऑस्ट्रेलियाकडून भारतीय कोवॅक्सिनला मंजुरी


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 सप्टेंबरला सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरोनाची लस घेतली होती.  मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर मोदींनी स्वत:चा लस घेत असतानाचा फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदींनीही कोवॅक्सिन हीच लस घेतली होती.


भारत बायोटेकने कोवॅक्सिन लशींला मान्यता मिळावी, यासाठी जुलै महिन्यात डब्ल्यू एच ओकडे मागणी केली होती. कोवॅक्सिन लशीला अखेर आज मान्यता मिळाली आहे. मात्र,अजूनही रशियाची स्पुतनिक लशीची मागणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, कोवॅक्सिनला डब्ल्यू एच ओची परवानगी स्पूतनिक लशीच्या आधी मिळाली आहे. 


Covaxin घेतलेल्यांना अमेरिकेत प्रवेश नाही, परदेशी नागरिकांसाठी अमेरिकेची नवी नियमावली


दरम्यान, लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून 2 ते 18 वर्षाच्या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस लवकरच मिळणार आहे. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन लस लहान मुलांना देण्यात यावी, अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे केली होती.