Congress Chief Attacks Centre: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका लेखाच्या माध्यमातून त्यांनी कोविड-19 विरोधात मोदी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज तसं लसीकरण का होत नाही. लेखात सोनिया गांधी यांनी पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोदी सरकारची तयारी नव्हती असं म्हटलं आहे.  


सोनिया गांधी यांनी आरोप केला आहे की,  ऑक्सीजनसाठी तडफडणारे रुग्ण, बेसहारा लोकांचं दु:ख सरकार समजू शकलं नाही. कोरोनाच्या विरोधातील लढाईला मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंटची संधी का समजत आहे? असा सवालही सोनिया गांधी यांनी केला आहे.  


PM Modi on Vaccination : लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, आता घराघरात लसीकरण मोहिम!


कोरोना पॉलिसीवरुन सोनिया गांधींची टीका 


सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज का होऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं आहे की, एक तृतीअंशपेक्षाही कमी लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, लहान बालकांच्या लसीकरणाविषयी अद्याप काहीही तयारी सरकारची दिसत नाही. विरोधी पक्ष सातत्यानं सरकारच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे मात्र दुसरीकडे सरकार लसीकरण अभियान जोरात चाललं असल्याचा दावा करत आहे.  



मोदी सरकारवर प्रियांका-राहुल गांधींचीही टीका 
दुसरीकडे महागाईवरुन प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सणासुदीचा काळ आहे. महागाईनं सामान्य जनता त्रस्त आहे. निवडणुकीच्या वेळी जनता यांना माफ करणार नाही. भाजप सरकारच्या 'लुटण्याच्या' विचारामुळं सणाच्या आधीच सामान्यांचं महागाईनं कंबरडं मोडलं आहे, असं प्रियांकांनी म्हटलं आहे. 


दुसरीकडे राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, दिवाळी आहे, दुसरीकडे महागाई वाढतेच आहे. व्यंग नाही मात्र खरंच मोदी सरकारकडे जनतेच्या दृष्टीनं विचार करणारं एक संवेदनशील हृदय हवं होतं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.