Bharat Bandh LIVE UPDATE : कृषी कायद्यांच्या विरोधात आज 'भारत बंद'; पाहा लाईव्ह अपडेट्स

Bharat Bandh LIVE Updates: केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला भारत बंद (bharat bandh) ची घोषणा केली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Sep 2021 01:19 PM
भारत बंदला बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटनांचा पाठिंबा

कृषी विषयक कायद्याविरोधात आज भारत  बंद आहे. या भारत बंदला बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.. विविध संघटनांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकरी कायदे त्याच बरोबर कामगार काद्यायत जाचक अटी टाकल्याने तात्काळ या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कामगारांनी केलीये. तसेच वाढते पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे भाव  वाढते खासगीकरण आणि अन्य अनेक मागण्यांसाठी आज कामगारांनी बंद पुकारला आहे..


 

 
सावंतवाडीत कॉंग्रेसच्यावतीने जोरदार घोषणाबाजी

 देशव्यापी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्हा काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी करत केंद्र सरकार विरोधात सावंतवाडीत कॉंग्रेसच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते यानी सावंतवाडीतील गांधी चौकात भारत बंदला पाठींबा देत आंदोलन केले.

यवतमाळमध्ये शेतकरी  नेत्यांचं धरणे आंदोलन





 यवतमाळ : केंद्र सरकारने नव्या कृषी कायद्यांना मंजुरी देऊन एक वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आज शेतकऱ्यांसह केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारत बंदची हाक दिली.  यवतमाळच्या बसस्थानक चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील विधवा महिला तसेच संयुक्त किसान मोर्चाच्या  नेत्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही सहभागी झाले यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वसंत पुरके यांनी या केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी कायद्या वर ताशेरे ओढले


 

 



 


भारत बंदच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यात मोटार सायकल रॅली

 संयुक्त किसान मोर्चाने आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात भारत बंदची हाक दिलीये. या भारत बंदच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यात मोटरसायकल रॅली काढलीय. बसस्थानक चौकातील काँग्रेस मुख्यालयापासून सुरू झालेली ही रॅली गांधी मार्ग, टिळक मार्ग, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन चौक या मार्गाने काढण्यात आलीय. हुतात्मा स्मारक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आलाय. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानं बंद करण्याची पटोलेंनी व्यापार्यांना विनंती केलीय. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना आणि वाहतूक नियमांचा पुर्णतः फज्जा उडवलाय.


यावेळी बोलतांना नाना पटोलेंनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात आजच्या बंदला काँग्रेसचा पाठींबा असल्याचं म्हटलंय.  शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांवरील कारवाईचा नाना पटोलेंनी निषेध केलाय. आता ईडी-सीबीआयची कारवाई सामान्य असल्याचं ते म्हणालेय. या संस्था आता भाजपाच्या ईशाऱ्यावर चालणाऱ्या संस्था असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


भाजपचे आमदार सुनील कांबळेंच्या महिला अधिकार्याला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटीवर पटोलेंनी टीका केलीय. महिलांचा अपमान ही भाजपची संस्कृती असल्याचं ते म्हणालेय. 


 नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे नेते आशिष देशमुखांकडून भाजपच्या प्रचारावर प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेतलीय. पक्ष निरिक्षकांच्या अहवालानंतर देशमुखांवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणालेय. नेता कितीही मोठा असला तरी बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशारा नाना पटोलेंनी आशिष देशमुखांना दिलाय.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील मंडईत शेतकरी संघर्ष समितीकडून आज निदर्शने
दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील मंडईत शेतकरी संघर्ष समिती कडून आज निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले.  त्याचबरोबर इतर पुरोगामी संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

 
भारत बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या भारत बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.सकाळी सहा वाजता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव बस स्थानक परिसरात आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.बस स्थानक परिसरात पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या  शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही.बस वाहतूक सुरळीत सुरू रहावी म्हणून बस स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर तर संतप्त शेतकरी महिलेने शेतकऱ्यांनी किती वर्षे अन्याय सहन करायचा,शेतकऱ्यांना सरकारने खड्ड्यात घालायचे ठरवले आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला.

मनमाड येथे किसान सभेतर्फे बंदला पाठींबा

केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे यासाठी अनेक दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरु असून हे कायदे रद्द करावे यासाठी आज अनेक संघटनांनी भारत बंदची हाक दिली मनमाड येथे किसान सभे तर्फे बंद ला पाठींबा देण्यासाठी बाजर समिती समोर मनमाड-चांदवड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी शेतक-यांना पिक विम्याचे पैसे त्वरीत देण्यात यावे,केंद्राने केलेले कायदे रद्द करावे अशा मागण्या करण्यात आल्या.रास्ता रोको मुळे मनमाड-चांदवड रस्त्यावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

नागपुरात रॅली काढून सीताबर्डीची मुख्य बाजारपेठ काही वेळासाठी बंद पाडली
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा ने भारत बंदचे आयोजन करत नागपुरात रॅली काढून सीताबर्डी ची मुख्य बाजारपेठ काही वेळासाठी बंद पाडली.. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे... आज नागपूरच्या व्हेरायटी चौकावर संयुक्त किसान मोर्चा, विविध मजूर संघटना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गोळा झाले.. काही वेळ चौकावरच मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली.. त्यानंतर सर्व कार्यकर्ते रॅलीच्या स्वरूपात सीताबर्डी च्या बाजारपेठेत गेले आणि मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आव्हान करत दुकान बंद करण्यास सांगितले... सीताबर्डी बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी ही त्यांची दुकानं बंद करत बंदला पाठिंबा दिला..

 
विक्रोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रास्ता रोको

आज संयुक्त किसान मोर्चा ने भारत बंदची हाक दिली होती. केंद्रसरकारने शेतकऱ्यांना संदर्भात केलेले कायद्याच्या विरोध, महागाई अश्या विविध मुद्द्यांवर हा भारत बंद होता. मुंबईच्या विक्रोळी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तर रास्ता रोको करण्यात आला.विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर बिंदु माधव चौकात हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत एकत्र आले, आणि जवळपास पाच ते दहा मिनिटं रास्ता रोको केला.पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता रस्त्यावर झोपून काही वेळ रस्ता रोको केला पोलिसांची कुमक आल्यावर त्यांना बाजूला काढण्यात आले.

वाशिममध्ये कृषी कायद्यांच्या निषेधार्थ बंद

वाशिममध्ये कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली. भाजप मित्र पक्ष  वगळता   सर्व  पक्षाने  चांगलाच या बंदला प्रतिसाद दिला असून  वाशीम मध्ये  सुद्धा  शिवसेना  आणि कॉंग्रेसच्या  वतीने   केंद्र सरकारच्या  विरोधात घोषणाबाजी केली

नाशिकमध्ये या बंदला अल्प प्रतिसाद

 किसान सभेच्या वतीने आज भारत बंदची घोषणा करण्यात आली असून नाशिकमध्ये या बंदला अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. आज दुपारी कॉंग्रेस भवन पासून भारत बंदच्या पार्श्वभूमिवर आणि मोदी सरकारच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कॉग्रेससह, किसान सभा आणि अनेक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. मोदी सरकार विरोधात हातात निषेधाचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. 

पार्श्वभूमी

Bharat Bandh: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन  कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) ची घोषणा केली आहे. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.


भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) नं एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे की, कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळं आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर या बंदला पाठिंबा द्यावा, असं या पत्रकात म्हटलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.