पहिल्यांदाच आमदार ते मुख्यमंत्री, राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना रिप्लेस करणारे भजन लाल शर्मा कोण?
भजन लाल शर्मा (Bhajan lal Sharma) यांना भाजपने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची (Rajasthan New Chief Minister) धुरा दिली. वसुंधरा राजे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना डावलत भाजपने भजनलाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली.
Bhajanlal Sharma new CM Rajasthan : छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशप्रमाणेच भाजपने राजस्थानमध्येही नव्या चेहऱ्याला संधी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. भजन लाल शर्मा (Bhajan lal Sharma) यांना भाजपने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची (Rajasthan New Chief Minister) धुरा दिली. वसुंधरा राजे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना डावलत भाजपने भजनलाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. दीर्घकाळापासून ते भाजपसाठी काम करत होते, भजनलाल यांची निवड करत भाजपने सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केले. (Bhajanlal Sharma elected new Rajasthan Chief Minister)
भजन लाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी आहेत. ते दीर्घकाळापासून भाजपच्या संघटनात कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलेय. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजन लाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भजन लाल शर्मा विजयी झाले. त्यांना 1,45,000 इतकी मते मिळाली होती. भजनलाल यांनी काँग्रेसच्या पुष्पराज भारद्वज (Pushpendra Bhardwaj ) यांचा पराभव केला होता. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देत भाजपने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
56 वर्षीय भजनलाल शर्मा राजस्थानच्या सांगानेर विधानसभा जागेवरुन पहिल्यांदाच निवडून आले. भजनलाल शर्मा ब्राह्मण समाजाचे आहेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. भजनलाल शर्मा मागील अनेक वर्षांपासून भाजपसाठी ग्राऊंड लेव्हलवर काम पाहत होते.
भजनलाल शर्मा यांनी प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्षसंघटनेत काम केलेय. आमदार म्हणून ते पहिल्यांदाच निवडून आले. तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजनलाल यांना संधी देण्यात आली. भजनलाल यांना तिकीट दिलं त्याविरोधात लाहोटी समर्थकांनी भाजप मुख्यालयात आंदोलन केलं होतं. भजनलाल शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे.
वसुंधरा राजेंना निरोप -
भजनलाल शर्मा यांच्या रूपाने राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली. त्यानंतर आता वसुंधरा राजे यांचं राजस्थानमधील राज्य संपुष्टात आलेय. राजे यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. पक्ष मुख्यमंत्रिपदाची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवू शकते, असे संकेत भाजपकडून आधीच देण्यात आले होते. त्यामुळे यावेळी वसुंधरा मुख्यमंत्री होणार नाहीत हे निश्चित मानले जात होते.