Bengaluru Traffic Police : बंगळूर शहरात वाहतूक कोंडीची शक्यता; पुढील तीन दिवस 'या' मार्गांवर प्रवास करण्यापूर्वी विचार करा!
Bengaluru Traffic Police : आयटी शहर बंगळूरमधील पॅलेस ग्राउंडमध्ये होत असलेल्या दोन मोठ्या कार्यक्रमांमुळे आजपासून (24 नोव्हेंबर) वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
Bengaluru Traffic Police : आयटी शहर बंगळूरमधील पॅलेस ग्राउंडमध्ये (Bengaluru Traffic Police) होत असलेल्या दोन मोठ्या कार्यक्रमांमुळे आजपासून (24 नोव्हेंबर) वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एकंदरीतच नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बंगळूर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. तसेच त्याचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.
'ಸಂಚಾರ ಸಲಹೆ'
— ಬೆಂಗಳೂರು ಸಂಚಾರ ಪೊಲೀಸ್ BengaluruTrafficPolice (@blrcitytraffic) November 23, 2023
'Traffic Advisory' pic.twitter.com/2cmxFQzyNf
पोलिसांनी वाहतूक कोंडीमुळे बेल्लारी रोड आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. या ठिकाणी आजपासून 26 तारखेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. आजपासून टुलू कुट परिषद बंगळूर शहरामध्ये होत आहे. यामध्ये जवळपास पाच लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. या परिषदेच्या आयोजक समितीकडून हा दावा करण्यात आला आहे.
'ಸಂಚಾರ ಸಲಹೆ'
— ಬೆಂಗಳೂರು ಸಂಚಾರ ಪೊಲೀಸ್ BengaluruTrafficPolice (@blrcitytraffic) November 23, 2023
'Traffic Advisory' pic.twitter.com/SZMMNWs3ND
25 आणि 26 नोव्हेंबर रोजी कम्बाला कार्यक्रम सुद्धा होणार
दरम्यान 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी कम्बाला कार्यक्रम सुद्धा होणार आहे. तो कार्यक्रम सुद्धा बंगळूर पॅलेस याच ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी दोन दिवसात 15 लाख लोक एकत्रित येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे बेल्लारी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनं पोहोचल्याने वाहतू कोंडीचा सामना करावा लागू शकतो. याठिकाणी जवळपास 200 बैल आणि 300 गाड्या येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे या भागाला लागून असलेल्या सर्वच भागांमध्ये वाहतूक कोंडी होणे शक्यता आहे.
बेल्लारी रोड परिसरात जाऊ नये
गोटा हल्ली, सदाशिवनगर, वालिकवल, न्यू बीईएल रोड, मेखरी सर्कल, जयमाला मेन रोड, कंटेनमेंट स्टेशन, हेब्बल, गानेहल्ली आणि इतर भागांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आजपासून पुढील तीन दिवसांसाठी पोलिसांकडून माहिती जारी करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसांसाठी म्हणजे 24, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी बेल्लारी रोड परिसरात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. परिषद आजपासून बंगळूरमधील पॅलेस ग्राउंडवर होत आहे.
आयोजक समितीकडून दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 5 लाख लोक सहभागी होतील. 25 आणि 26 नोव्हेंबरला कम्बाला कार्यक्रम सुद्धा पॅलेस ग्राउंडवर होणार आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी जवळपास 15 लाख लोक या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी येतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे बेल्लारी रोडवर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या