संतापजनक! धोतर घातल्यामुळे शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला, VIDEO VIRAL
Bengaluru : पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकिट बूक केलं, पण मॉलमध्ये गेल्यानंतर धोतर घातल्यामुळे प्रवेश नाकारला गेला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Bengaluru : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना घडला आहे. धोतर घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकिट बूक केलं होतं. पण मॉलमध्ये पोहचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना प्रवेश नाकारला. त्या शेतकऱ्याने धोतर घातले होते, त्यामुळे मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांचं समर्थ करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये आंदोलन केले. त्याशइवाय मॉलच्या मॅनेजमेंटला यासंदर्भात जाब विचारला.
नेमकं झालं काय ?
पेशानं शेतकरी असणारे नागराजप्पा कुटुंबासह मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पोहचला होता. त्यांच्याकडे चित्रपटाची तिकेटही होती, जी ऑनलाईन बूक करण्यात आली होती. पण पारंपारिक पोषाक परिधान करणाऱ्या नागराजप्पा यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. धोत घातल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना जाण्यास मज्जाव घातला. नागराजप्पा आणि त्यांच्या मुलाने आपल्याकडील तिकिटे दाखवत, आतमध्ये सोडण्याची विनंती केली. पण उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांच्यासोबत आपत्तीजनक वागणूक दिली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर काही कन्नड संघटनांमधील सदस्यांनी धोतर घालत या घटनेचा विरोध दर्शवला. प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर मॉलमध्ये पोलिस तैणात करण्यात आले.
Elderly farmer denied entry to GT world shopping mall in #Bengaluru cuz he was wearing a Dhoti 🤷🏻♂️ Fakeerappa, a farmer in his 70's was hoping to watch a movie with his family, had booked his ticket prior, but was stopped at the gates of @gtworldmall Magadi rd cuz of his attire! pic.twitter.com/VxpuCcyYzu
— Preetham daivik (@Preetham80621) July 17, 2024
मॉल मॅनेजमेंटकडून माफीनामा -
मॉलमधील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीविरोधात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मॉल मॅनेजमेंटकडून याप्रकरणाबाबात माफी मागण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. आपल्याविरोधात आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहून मॉलमधील मॅनेजमेंटकडून त्या शेतकऱ्याला म्हणजेच नागराजप्पा यांना बोलवून माफी मागितली. आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं समजल्यानंतर मॉल मॅनेजमेंटकडून त्या शेतकऱ्याला शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
#WATCH | Karnataka: A group of farmers, along with pro-Kannada organisation, protests in front of GT World Mall in Bengaluru, alleging denial of entry to a farmer who was wearing 'dhoti'. pic.twitter.com/dhf6LPOou4
— ANI (@ANI) July 17, 2024
सुरक्षा कर्मचाऱ्याकडून स्पष्टीकरण -
वाढता विरोध पाहिल्यानंतर मॉलमधील मॅनेजमेंटकडून शेतकऱ्याची माफी मागितलीच. त्याशिवाय प्रवेश नाकारणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानेही या प्रकरणाबाबात स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की, ज्यावेळी शेतकरी मॉलमध्ये आला, त्यावेळी धोतर त्यानं वरती घेतलं होतं. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या महिलांनी तक्रार याबाबत तक्रार केली होती. त्याबाबत कारवाई करत त्यांना प्रवेश नाकारला होता. दरम्यान, नागराजप्पा यांच्या मुलाने असा दावा केला की, आम्ही ज्यावेळी मॉलमध्ये जात होतो, त्यावेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला जाण्यास मज्जाव केला होता. आम्हाला आतमध्ये जाऊच दिले नव्हते.