बेळगाव:  तिरुपती (Tirupati) येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील पाच भाविकांचा आंध्रप्रदेशमधील मथपल्ली येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही  दुर्दैवी घटना पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली आहे. क्रुझर वाहनाने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची  प्राथमिक माहिती समोर आली आहे.


  क्रुझर वाहनातून सोळा जण तिरुपतीला गेले होते. अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील सोळा जण तिरुपतीला गेले होते. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून पोलिसांना कळवले. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.


जखमींना रुग्णालयात केले दाखल


पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रुझर वाहनातील जखमींना बाहेर काढून तिरुपती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात मृत झालेल्या पाच जणांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवले आहेत. हनुमंत अजुर (52), मनंदा अजुर (46), शोभा अजुर (36), अंबिका अजुर (19) आणि हणमंत जाधव (52) अशी मृतांची नावे आहेत. 


 कंटेनरने रिक्षाला चिरडलं; बीडमधील भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू, एक गंभीर जखमी


धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळीकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि चिरडलं.  या भीषण अपघातात (Accident) रिक्षातील आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे. गंभीर जखमी रुग्णाला उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा भीषण अपघात बीड-परळी रोडवरील बकरवाडी फाट्यावर घडला.  अजीम शेख (रा. इस्लामपुरा राजू चौक) हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सकाळी धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रविवारी रात्री तिथून परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरने आपला ताबा सुटला, त्यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला (एमएच 20 एफएफ 0312) जोराची धडक बसली, यामध्ये नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाले. या धक्कदायक घटनेत रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


हे ही वाचा :


Rajasthan Accident : राजस्थानमध्ये बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 11जणांचा मृत्यू तर 12 जखमी