नवी दिल्ली : नोएडामध्ये ग्रेटरच्या बिसरख कोतवाली परिरातील आम्रपाली इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. आम्रपाली ग्रुपच्या एका इमारतीचे काम सुरू होते. यामध्ये आधी चार कामगारांचा मृत्यू झाला आहे तर जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गौर सिटी एक मूर्तीजवळ इमारतीचे काम सुरू होते. काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेक चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. दुर्घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये बांधकामसाठीचे साहित्य आणि कामगार होते. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपूरच्या टभका गावात राहणारे होते.
ठाण्यामध्येही घडला होता प्रकार
ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली. यामध्ये सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रुफिंगचं हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते.