Rajasthan Accident: राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे साडे चार वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. काही प्रवासी आणि बसचा चालक बसच्या मागच्या बाजूला येऊन थांबले होते. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर आला आणि त्यानं बसला जोरदार धडक दिली. यामध्ये एकूण 23  जण चिरडले गेले, ज्यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमधले सर्व प्रवासी हे गुजरातमधील भावनगरहून मथुरोला जात होते. 


मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांनी भरलेली बर भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होती. या अपघातात सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.   सर्व मृत आणि जखमी प्रवाशी भावनगरचे रहिवासी आहेत.  डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती.  तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर आला आणि त्यानं बसला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लखनपूर, नदबई, हलैना, वैरथाना स्थानकातील पोलिसांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाक गुजरातच्या भावनगरहून बस जयपूर आणि भरतपूरमार्गे मथुरेला चालली होती.पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये सहा महिलांचा आणि पाच पुरुषांचा समावेश होता. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी 11 जणांना मृत घोषित केले. तर 20 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.