Bastar News: छत्तीसगडमधील (Chhattisgarh News)  एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या  सीआरपीएफ जवानाचे (CRPF Jawan)  रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं.छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलग्रस्त भागाता तैनात असलेला सीआरपीएफ जवान एक महिन्यांपासून बेपत्ता होता. सीआरपीएफ जवानाच्या पत्नीने पती  बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.  जवानाला शोधण्यास पोलिसांना यश मिळाले असून तपासात जवानाने धक्कादायक माहिती दिली आहे.  पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे  जवानाने पोलिसांना सांगितले. 


निर्मल कटारिया असे बेपत्ता सीआरपीएचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाची पत्नी त्याला मारहाण तसेच शिवीगाळ करत होती.  पत्नीच्या या रोजच्या जाचाला कंटाळून निर्मल कटारियाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. जवानाने पोलिसांना आपल्या जबबात सांगितले की, पत्नीच्या मारहाणीमुळे मी गेली सहा महिने कामावर देखील गेलो नाही. माझ्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे. तसेच  माझी पत्नी माझ्या चारित्र्यावर संशय देखील घेते. 


महिन्याभरानंतर जवान सापडला


सीआरपीएफ जवान निर्मल कटारिया  पत्नी आणि चार वर्षाच्या मुलासह जगदलपूर येथील शांतीनगर येथे एका भाड्याच्या घरात राहतो. काही दिवसापूर्वी निर्मलची पत्नी हिनाने पती बेपत्ता असल्याची माहिती पत्रकारांना दिली होती. तसेच सीआरपीएफचे  अधिकारी माझ्या पतीला शोधण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याचा आरोप देखील केला होता.  त्यानंतर पत्नी हिनाने बस्तरचे आयजी सुंदरराप पी यांच्याकडे मदत मागितली.  सीआरपीएफ जवान निर्मल कटारियाच्या अचानक अचानक गायब झाल्यामुळे सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये गोंधळ उडाला. बोधघाट ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर एसपीच्या आदेशानंतर एक टीम बनवण्यात आली. अखेर या टीमला महिन्याभरानंतर यश मिळाले.  मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये जवान सापडला. परत आल्यानंतर जवानाने पत्रकारांशी संवाद साधताना मोठे खुलासे केले.


पत्नीला कंटाळून घर सोडण्याचा निर्णय 


जवानाने सांगितले, माझे लव्ह मॅरेज आहे. मला माझ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आहे. अनेकदा मी माझ्या पत्नीला फोनवर बोलताना पकडले आहे. त्यांच्याशी बोलू नको असे म्हटल्यानंतर माझ्या पत्नीने मला मारहाण केली. रोज आमचे य गोष्टीवर भांडण होत असे. मी ड्यूटीवर गेलो तरी माझी पत्नी नाराज होत असे. अधिकाऱ्यांना फोन करायची. या सर्व गोष्टींना कंटाळून मी घर सोडून जाण्याचे नियोजन केले, परंतु पोलिसांनी मल शोधले. तसेच चार वर्षाचा मुलगा हा माझा नाही. त्याच्या डीएनए टेस्टसाठी मी अर्ज देखील केला आहे. मला माझ्या पत्नी आणि मुलासोबत राहायचे नाही. मला पुन्हा कामावर रूजू होणार आहे. या सर्व प्रकरानंतर पती- पत्नीमधील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी दोघांचे काऊन्सलिंग देखील करण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :


Pune Crime News : पत्नीची हत्या करुन फरार झाला, त्यानंतर नाव बदलून दुसरं लग्न केलं; मात्र 28 वर्षांनी पुणे पोलिसांनी पकडलंच