एक्स्प्लोर

इंजिनिअर तरुण घोड्यावरुन ऑफिसला, पाटी लिहिली...

बंगळुरुमधील रिंग रोड परिसरात अॅम्बेसी गोल्फ रिंग या कंपनीत तो काम करत होता. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑफिसमधला अखेरचा दिवस, असा मेसेजही त्याने घोड्यावर लावला होता.

बंगळुरु : नोकरीचा शेवटचा दिवस अनेकांसाठी इमोशनल असतो. सहकाऱ्यांना निरोप देण्याचं दुख: असतंच पण नव्या नोकरी आनंदही शेवटच्या दिवशी असतो. शेवटचा दिवस लक्षात राहावा, यासाठी काही सहकारी सरप्राईज प्लॅनही करतात. पण बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा ऑफिसमधील शेवटचा दिवस खास ठरला. कारण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसला गेला. आपला सहकारी घोड्यावरुन आल्याचं पाहून सर्वच अवाक् झाले. रुपेश वर्मा असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नावं असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगळुरुमधील रिंग रोड परिसरात अॅम्बेसी गोल्फ रिंग या कंपनीत तो काम करत होता. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑफिसमधला अखेरचा दिवस, असा मेसेजही त्याने घोड्यावर लावला होता. पण सकाळी सात वाजता निघालेला रुपेश ट्रॅफिक आणि घोड्याच्या विश्रांतीमुळे दुपारी दोन वाजता ऑफिसला पोहोचला. इंजिनिअर तरुण घोड्यावरुन ऑफिसला, पाटी लिहिली... दरम्यान, रुपेश घोड्यावर बसून आल्याने त्याला कंपनीच्या गेटवरच अडवण्यात आलं होतं. मात्र घोडाही प्रवासाचं साधन आहे, असं म्हणत रुपेश घोड्याला घेऊन कंपनीच्या कॅम्पसमध्ये दाखल झाला. मूळचा राजस्थानचा असलेल्या रुपेशला नोकरीचा कंटाळा आल्यामुळे त्याने राजीनामा दिला. 'सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आम्ही परदेशी कंपन्यांसाठी काम करतो. सॉफ्टवेअरशी संबंधित कठीण समस्या सोडवतो. मग हेच काम आम्ही स्वत:च्या देशासाठी का करु शकत नाही? देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याने नोकरी सोडली. आता स्वत:चं स्टार्टअप सुरु करण्याचा माझा विचार आहे, असं रुपेशने सांगितलं. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Embed widget