नवी दिल्ली : केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्याला १ वर्षाच्या लहान पाहुण्याला निमंत्रण देण्यात आलंय. निकालाच्या दिवशी केजरीवालांसारखी वेशभूषा या चिमुकल्याने केली होती. आपच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुनही ‘मफलरमॅन’ या कॅप्शनसहीत त्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. दिल्ली विधानसभा निकालाच्या दिवशी बेबी मफरलरमॅनचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आणि बघता बघता हा चिमुकला सोशल मीडियावर स्टार बनला आहे.


आम आदमी पार्टीने बेबी मफलरमॅनला शपथविधी सोहळ्याला बोलावल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. आपने मफलरमॅनचा फोटो शेअर करत लिहले आहे, 'मोठा घोषणा: बेबी मफलरमॅनला  16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. ज्युनियर तयार रहा'


कोण आहे हा बेबी मफलरमॅन?

आपच्या मुख्यालयाबरोबरच सोशल मीडियीवर चर्चेचा विषय ठरलेल्या या 'बेबी मफलरमॅन' चे खरं नाव अव्यान तोमर आहे. अव्यान अवघ्या एका वर्षाचा आहे. अव्यानच्या वडीलांचे नाव राहुल तोमर आणि आईचे मिनाक्षी तोमर आहे. अव्यानचे वडील राहुल हे आपचे आणि अरविंद केजरीवाल यांचे चाहते आहे. निकाल्याच्या दिवशी सकाळी अव्यानला केजरीवाल यांच्यासारखा पोशाख करून आपच्या मुख्यालयाबाहेर घेऊन गेले.

अरविंद केजरीवाल यांच्या पोशाखातील हा चिमुकला सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. यामध्ये अव्यानने केजरीवाल यांच्याप्रमाणे मफलर आणि स्वेटर घातले आहे. अरविंद केजरीवाल यांना याच पोशाखानंतर सोशल मीडियावर मफलरमॅन हे नाव मिळाले होते. आता अव्यान विधानसभा निकालाच्या दिवशी मफलरमॅन च्या पोशाखात पोहचला. तेव्हा पासून या ज्युनियरला बेबी मफलरमॅन हे नाव मिळाले.

देशात अरविंद केजरीवाल यांचे मोठे समर्थ आहे. अरविंद केजरीवाल यांच्या चाहत्याने चक्क आपल्या बाळाचे नाव केजरीवाल ठेवले आहे. स्वत: केजरीवाल यांनी ही माहिती ट्वीट करत दिली आहे.


16 फेब्रुवारीला रामलिला मैदानावर अरविंद केजरीवालांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्ली बाहेरच्या नेत्यांना आमंत्रण देण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे.

EXPLAINER VIDEO | दिल्लीच्या निकालातून महाविकास आघाडीने काय बोध घ्यावा? | ABP Majha



संबंधित बातम्या : 

Delhi Election Result 2020 | 'दिल्ली' विजयानंतर आपची पहिली बैठक, विधिमंडळ नेत्याची होणार निवड