Delhi Election Result 2020 | 'दिल्ली' विजयानंतर आपची पहिली बैठक, विधिमंडळ नेत्याची होणार निवड
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2020 09:25 AM (IST)
दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवलीय. निकालानंतर आज 11 वाजता नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय. यात पक्षाचा विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे.
**EDS: RPT, CORRECTS A WORD** New Delhi: Delhi Dy CM and AAP leader Manish Sisodia waves a flag as he celebrates along with his supporters after winning from the Patparganj Assembly seat, in New Delhi, Tuesday, Feb. 11, 2020. (PTI Photo) (PTI2_11_2020_000114B)
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. निकालानंतर केजरीवाल यांनी आज आपल्या निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी ही माहिती दिली. ही बैठक सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणार असून आम आदमी पक्षाचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी 14 किंवा 16 फेब्रुवारी या दोन तारखांवर विचार सुरू असल्याचं आपच्या एका नेत्याने सांगितले. शपथविधी सोहळ्यासाठी रामलीला मैदानाचा विचार केला जात असून भव्य कार्यक्रमाचे नियोजन असल्याचंही ते म्हणाले. मात्र, शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणाविषयी अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. पक्षाने विधिमंडळ नेता निवडल्यानंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांना याबाबत माहिती देण्यात येईल, त्यानंतर अधिसूचना जारी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. Delhi Election Result 2020 | दिल्लीत 'आप'ला एकाहाती कौल, 62 जागांवर आघाडी आपची एकहाती सत्ता - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपने 70 पैकी 62 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवलीय. भाजपने उर्वरित 8 जागा ताब्यात घेतल्या, तर दिल्लीवर 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. आपच्या मागील वेळेपेक्षा चार जागा कमी झाल्यात. तर, भाजपच्या चारने वाढल्या आहेत. मात्र, काँग्रेस सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे. हा विजय दिल्लीकरांचा - केजरीवाल अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, दिल्लीतील विजय माझा विजय नाही. दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे. ज्यांनी मला मुलगा मानलं आणि एवढं समर्थन दिलं. हा त्या कुटुंबाचा विजय आहे, ज्या घरांना 24 तास वीज मिळाली. हा त्या कुटुंबाचा विजय आहे, ज्यांना दिल्लीतील रुग्णालयात चांगले उपचार घेता आले. दिल्लीतील जनतेनं नव्या राजकारणाला जन्म दिलाय. दिल्लीतीली लोकांना संदेश दिला की जे शाळा बांधतील आम्ही त्यांनाच मतदान करू, जे परिसर स्वच्छ ठेवतील, जे 24 तास वीज देतील, रस्ते बांधतील. आजचा विजय केवळ दिल्लीचा विजय नाही तर संपूर्ण भारताचा विजय आहे. Arvind Kejriwal | अरविंद केजरीवालांची विजयाची हॅटट्रिक, मतदारांचे केजरीवालांकडून आभार! नवी दिल्ली