एक्स्प्लोर

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी आज निकाल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिद पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. ह्या दरम्यान अनेक रंजक घडामोडी घडल्या.

अयोध्या : अयोध्येतला राम जन्मभूमीचा खटला निकाली निघाला आहे. तिथे भूमिपूजन पण झाले. आता 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज येणे अपेक्षित आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटला लखनौच्या विशेष न्यायालयात खटल्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ह्या 28 वर्षात काय काय घडले याचा हा लेखाजोखा आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारच्या पहिला शिलान्यास सोहळा ते 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. ह्या दरम्यान अनेक रंजक घडामोडी घडल्या. देशातला एका मोठा समुदायास या निकालाची प्रतिक्षा आहे. राम मंदिरासंदर्भात निकाल देताना मशिद बेकायदेशीरपणे तोडली गेली असा उल्लेख आहे. आज मशिद कुणी पाडली? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

उत्तर प्रदेशच्या अयोध्या मधील बाबरी मशिदीची निर्मिती मोगल बादशहा बाबरचा जनरल मीर बाकी यांनी केली होती, अनेक ऐतिहासिक दस्तांवेजांनुसार ही मशिद रामाचे जन्म स्थळ असलेल्या मंदिरा वरच बांधली गेली होती. ज्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाने यावर्षीच निवाडा दिला आहे.

1949-रामाच्या मुर्ती बाबरी मशिदीत प्रकटल्या डिसेंबर 1949 मध्ये, भगवान रामांच्या मूर्ती मशिदीच्या आत प्रकटल्या किंवा कुणीतरी आणून ठेवल्या. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी खटले दाखल करण्यात आले. हाशिम अन्सारी यांनी मुस्लिमांकरिता खटला दाखल केला आणि पुढील वर्षांत निर्मोही अखाडा यांनी हिंदूंसाठी एक खटला दाखल केला. सरकारने या जागेला वादग्रस्त घोषित करून त्यास कुलूप लावले. रामजन्मभूमी न्यासचे प्रमुख महंत परमहंस रामचंद्र दास यांनी 1989 मध्ये जागेच्या मालकी हक्काची याचिका दाखल केली.

1984 - विश्व हिंदू परिषदेची जन्मभूमी वादात उडी   विश्व जन्म परिषद रामजन्मभुमी आंदोलन सुरू करण्यासाठी एक गट स्थापन केला. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्या जागेवर भव्य ‘राम मंदिर’ बांधण्याच्या मोहिमेचा नेता आणि चेहरा बनविण्यात आले आहे. 1986 साली फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी विवादित जागेचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले. हिंदूना मशिदीत प्रवेश करुन पूजा करण्याची परवानगी देण्यात आली.

1990- बाबरी मशिद पाडण्याचा पहिला प्रयत्न तत्कालीन भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी देशभर रथयात्रा काढली. या वर्षी व्हीएचपी स्वयंसेवकांनी बाबरी मशीदचे अंशतः नुकसान केले. केंद्रात जनता दलाचे सरकार असताना मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 30 ऑक्टोबर 1990 रोजी यादव यांनी बाबरी मशिदीकडे निघालेल्या जमावावर गोळीबार करण्याचे पोलिसांना आदेश दिले. सरकारच्या म्हणण्यानुसार त्यात 16 कारसेवकांचा मृत्यू झाला. ह्या घटनेच्या दोन वर्षानंतर 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली.

घटनेनंतर दोन एफआयआर नोंदविण्यात आले. प्रथम गुन्हा क्रमांक 197/1992 आणि दुसरा 198/1992 होता. ह्यात हजारो अज्ञात कारसेवकांवर दरोडे, दुखापत करण्याचा प्रयत्न, सार्वजनिक पूजा स्थळे अपवित्र करणे, धर्मिक कारणास्तव दोन गटांत वैर वाढविणे इत्यादी आरोप ठेवले गेले. राम कथा कुंज सभा मंचवरून द्वेषपूर्ण भाषणे दिल्याबद्दल भाजप, व्हीएचपी, बजरंग दल आणि आरएसएसच्या आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातले आठ आरोपी होते लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, विनय कटियार, उमा भारती, साध्वी ऋुंतुबरा, मुरली मनोहर जोशी, गिरीराज किशोर आणि विष्णू हरी डालमिया. या आठ पैकी अशोक सिंघल आणि गिरीराज किशोर यांचे निधन झाले आहे. एफआयआरमध्ये कलम 153-ए, 153-बी आणि कलम 505 आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

लिबरहान कमिशन नियुक्त बाबरी मशिद पडल्याच्या दहा दिवसानंतर 16 डिसेंबर रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. लिबरहान यांची नेमणूक करण्यात आली. लिबरहान यांनी मशिद पडल्याच्या घटनाक्रमाची चौकशी करायची होती. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत सरकारने म्हटले होते की आयोगाने आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करावा. पण आयोगाला 48 वेळा मुदतवाढ देण्यात आली. आयोगावर आठ कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्यावर दीड दशकांनी म्हणजे 2009 साली अहवाल सादर करण्यात आला.

न्यायालयीन प्रक्रियेला सुरूवात

1993 साली खटल्यांचा निवाडा करण्यासाठी ललितपुरात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. परंतु नंतर राज्य सरकारने अलाहाबाद हायकोर्टाशी सल्लामसलत करून ललितपूर येथील विशेष न्यायालयातून लखनौच्या विशेष न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी हलविण्यासाठी अधिसूचना जारी केली. एफआयआर 197 चा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता आणि सुनावणी लखनौला हलविण्यात आली. तर एफआयआर 198 चा खटला रायबरेलीच्या विशेष न्यायालयात चालविला जायचा आणि त्याची चौकशी राज्य सीआयडी करत होते. ह्या दोन गुन्ह्यात आणखी काही कलमे पुन्हा जोडण्यात आली होती.

1993 साली सीबीआयची चार्जशीट एका महिन्यानंतर, 5 ऑक्टोबर 1993 रोजी सीबीआय एकत्रित आरोपपत्र दाखल केले. त्यात एफआयआर 198 चा समावेश होता. ह्या आरोपपत्रात मुळच्या आठ आरोपींसह बाळासाहेब ठाकरे, कल्याणसिंग, चंपत राय बंसल, धरम दास, महंत नृत्य गोपाल दास आणि इतर आरोपींची नावे जोडण्यात आली. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्राप्रमाणे मशीद पाडण्याच्या एक दिवस आधी बजरंग दलाचे नेते विनय कटियार यांच्या निवासस्थानी छुप्या बैठकीबद्दल बोलले गेले होते, “ज्यामध्ये वादग्रस्त रचना पाडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.” या बैठकीत आरोपपत्रानुसार अडवाणी आणि अन्य सात नेते उपस्थित होते. 8 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारने सगळे गुन्हा एकत्रित करणारी नवीन अधिसूचना जारी केली. बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित सर्व खटले लखनौमधील विशेष कोर्टाद्वारे चालवले जावू लागले.

शेवटी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्या आधारे कोर्टाने मानले की लालकृष्ण अडवाणी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे आणि इतर नेत्यांविरूद्ध कट रचल्याचा आरोप ठेवण्यासाठी सबळ पुरावा होता. लखनौच्या विशेष न्यायाधीशांनी आदेश दिला की, गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपाखाली सर्व आरोपींविरोधात आयपीसीच्या इतर विविध कलमांद्वारे प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयानं काय म्हटलंय आदेशानुसार असे म्हटले आहे: "वरील चर्चेतून हा निष्कर्ष काढला गेला आहे की सध्याच्या प्रकरणात आरोपींनी बाबरी मशिद पाडण्याचा कट 1990 साली रचला आणि 6 डिसेंबर 1992 साली तो पूर्ण केला. अडवाणी आणि इतर व्यक्ती वादग्रस्त मशिद पाडण्याचा कट सतत रचत होते."  या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आव्हान दिले गेले. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या प्रशासकीय चुकांमुळे आरोपीवर लावलेले आरोप चुकीचे आहेत असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला. दोन आरोपपत्र एकत्रित करणे चुक होते हा मुद्दा न्यायालयाने मानला आणि कट रचल्या बद्दलचे प्रकरण रायबरेली न्यायालयाकडे वर्ग केले. तिथे अडवाणींसह इतरांविरोधात खटला चालवावा आणि सीबीआयनी पुरावे द्यावेत असे आदेश दिले.

2003 साली सीबीआयने आठ आरोपींविरोधात पूरक आरोप दाखल केले. त्यात आडवाणी इतरांच्या भाषणामुळे मशिद पडली हे सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आले. रायबरेली कोर्टाने आडवाणी यांचा गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज कोर्टाचा हा आदेश बाजूला ठेवत अडवाणी आणि इतरांवर खटला चालू ठेवला. खटला पुढे सरकला, परंतु गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपातून आडवाणी आणि इतरांना वगळण्यात आले. 2005 साली रायबरेली कोर्टाने या प्रकरणात आरोप निश्चित केले आणि 2007 मध्ये पहिली साक्ष नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल 15 वर्षांनी.

2009: लिबरहान कमिशनने अहवाल सादर केला आयोग स्थापना झाल्यानंतर 17 वर्षांनंतर, लिबरहान कमिशनने 900 हून अधिक पानांचा अहवाल सादर केला. ह्या अहवालात संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यासारख्या भाजपाच्या प्रमुख राजकारण्यांवर दोषारोप ठेवण्यात आला.

अहवालातली नोंद अशी “आरएसएस, बजरंग दल, विहिंप, भाजपा आणि शिवसेनेचे नेते आणि त्यांचे कार्याकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी एकतर सक्रियपणे किंवा डोळेझाक करून या विध्वंसाला पाठिंबा दर्शविला. असा विचार करता येत नाही की एल. के. अडवाणी, ए.बी. वाजपेयी किंवा मुरली मनोहर जोशी यांना संघ परिवाराची आखणी माहित नव्हती." म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या उद्दीष्टात परिवाराच्या भाजपा हा एक अनिवार्य घटक होता.

2010 : अलाहाबाद हायकोर्टाने दोन प्रकरणांची विभागणी केली अलाहाबाद उच्च न्यायालयात सीबीआयने 4 मे 2001 च्या त्याच्या आदेशाविरोधात एक पुनरीक्षण याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये एफआयआर 197 आणि एफआयआर 198 अंतर्गत दोन खटले स्वतंत्रपणे चालवणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. हायकोर्टाने आपला पूर्वीचा निकाल कायम ठेवला. मशिदीपासून 200 मीटर अंतरावर कारसेविकांना उपदेश देणारे नेते आणि कार सेवक असे दोन वर्ग होते. तसेच अडवाणी आणि इतर यांच्याविरूद्ध एफआयआर 198 प्रकरणात गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप जोडले जाऊ शकले नाहीत याची पुष्टीही केली.

2011 : प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

या खटल्यात कनिष्ठ न्यायालये आणि उच्च न्यायालयात विलंब, प्रकरण खोळंबणे आणि इतर कायदेशीर अडचणी नंतर सीबीआयने अखेर 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले. सीबीआयने 20 मार्च 2012 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले. ज्यात सर्व प्रकरणांची एकत्रीत सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. 2015 साली बाबरी मशिद पाडल्याच्या केस मध्ये सीबीआयने त्यांच्यावरील गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप मागे न लावण्याच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंग यांच्यासह वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांना नोटीस बजावली.

2017 साली सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टाचा दोन खटले वेगळे करण्याच्या निर्णयाविरोधात आणि एफआयआर 198 अन्वये आरोपींविरूद्ध कट रचण्याचे आरोप फेटाळून लावले होतो ते निकाल रद्द केला. लालकृष्ण अडवाणी आणि 20 जणांसह सर्व आरोपींविरूद्ध कट रचण्याच्या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश बजावले. सर्व खटल्यांच्या खटल्याची सुनावणी आता एकत्र करून पुन्हा लखनौ कोर्टात आणण्यात आली आहे. आता आज 30 सप्टेबरला त्याचा निकाल लागणार आहे.

अंतिम सुनावणी कशाची सुरु होईल. एफआयआर 197 आणि 198 सह कलम 120 -बी (गुन्हेगारी कट रचने) कलमांसह एकत्रीत सुनावणी असल्याने आडवाणी यांच्यासह सर्व आरोपींवर पुढील आरोप लावण्यात आले आहेत: कलम 147, आयपीसी - दंगल. कलम 149, आयपीसी - बेकायदेशीरपणे एकत्रित जमणे. कलम 153ए, आयपीसी - धर्माच्या आधारावर द्वेष आणि वैर वाढविणे. कलम 135बी, आयपीसी - राष्ट्रीय एकात्मतेला धोका होईल असे वर्तन कलम 295 आयपीसी - पूजास्थळाचा विध्वंस करणे कलम 505, आयपीसी - धार्मिक भावना भडकावणेसाठी हेतूपूर्वक कृत्ये. कलम 120 बी, आयपीसी - गुन्हेगारी कट. कलम 363, आयपीसी - दगडफेक.

मूळच्या 49 पैकी 32 आरोपी जिवंत  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यात सुनावणी पूर्ण होण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. प्रथम कोर्टाने त्याला दोन वर्षांची मुदत दिली, जी एप्रिल 2019 मध्ये संपणार होती. जुलै 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवून खटल्याच्या सुनावणीची मूदत नऊ महिन्यांची वाढविली. ते नऊ महिने एप्रिल २०२० मध्ये संपले. पुन्हा 2020 मे मध्ये ही मुदत वाढवण्यात आली आहे. जी ३० सप्टेबर रोजी संपत आहे. या खटल्यातील मूळच्या 49 पैकी 32 आरोपी सध्या जिवंत आहेत.

एकूण आरोपींची नावे

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget