India China Relation : ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी व्यक्त केली दक्षिण चीन समुद्राबाबत चिंता व्यक्त केलीय. "प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत चीनची भारतासोबत असलेली कट्टरतावादी वृत्ती     दक्षिण चीन समुद्रात देखील तशीच आहे. चीनने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वाटाघाटीच्या प्रक्रियेद्वारे सीमा वाद सोडविण्याची वचनबद्धता दाखवली पाहिजे. कोणत्याही देशाने शेजारील देशासोबतचा सीमावाद बळजबरीने सोडविण्याचा प्रयत्न करणे ही चिंतेची बाब आहे, असे मत ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी व्यक्त केले आहे. 


ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स सोमवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांनी प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि खुल्या, मुक्त व नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या त्यांच्या सामायिक उद्दिष्टांबद्दल चर्चा केली. 
 
"चीन आजूबाजूला ज्या पद्धतीने नवीन बांधकाम करत आहे, ते आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. हे सर्व गेल्या दशकभरात करण्यात आले आहे. चीनच्या वृत्तीमुळे कट्टरतेची भावना विकसित झाली आहे." अशी चिंता मार्लेस यांनी व्यक्त केलीय. 


मार्लेस म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी दक्षिण चीन समुद्र आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांसोबत चीनची वागणूक अत्यंत वाईट होती. गाल्वन व्हॅलीतील घटनेच्या संदर्भात मार्लेस म्हणाले की, आम्ही भारताच्या सार्वभौमत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. दक्षिण चीन समुद्रातही आम्हाला असेच वर्तन जाणवत आहे. 


"दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट बनवण्याच्या आणि त्यावर कब्जा केल्याच्या दाव्यासंदर्भात अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि एलएसी या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रस्थापित मूलभूत नियमांचे चीन सातत्याने उल्लंघन करत आहे, असा आरोप मार्लेस यांनी केलाय.  


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Political Crisis : मोठी घडामोड; गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन 


Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?