Ram Mandir : तेलंगणात जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. खम्मम जिल्ह्यात एका ग्रामीण सरपंचाने भगवान श्री रामाचे भव्य मंदिर तयार केले. रघुनादपलम मंडलातील बुडीदमपाडू गावात मुस्लिम सरपंचाने 50 लाख रुपये खर्चून रामाचे मंदिर बांधले आहे. मुस्लिम सरपंचाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बुडीदमपाडू गावच्या सरपंच शेख मीरा साहेब यांनी स्वत: श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी 25 लाख रुपये दान केले, तर उर्वरित 25 लाख देणगी स्वरूपात जमा करून राम मंदिर तयार केले.
जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण
खम्मम जिल्ह्यातील रघुनादपलम मंडलातील बुडीदमपाडू गावात मुस्लिम सरपंच शेख मीरा साहेब यांनी 50 लाख रुपये खर्चून बांधलेले रामाचे मंदिर तयार केले. बुडीदमपाडू गावातील रामालयाचे अनेक वर्षांपासून बांधकाम सुरू होते आणि अनेक प्रयत्न करूनही ते पूर्ण होऊ शकले नाही. रामालयाच्या उभारणीत अनेक बडे लोक अपयशी ठरल्यानंतर सरपंच शेख मीरा यांनी पुढाकार घेतला.
मुस्लिम सरपंचांनी मंदिरासाठी दिली 25 लाखांची देणगी
बुडीदमपाडू गावच्या सरपंच शेख मीरा साहेब यांनी मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारून 25 लाख रुपये दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तीन आदिवासी बांधवांना जमीन दान करण्यास सांगितले आणि स्वत:च्या पैशातून तसेच इतरांनी दान केलेल्या सुमारे 50 लाख रुपये देऊन मंदिर बांधले. शेख स्वतः मंदिरात आणि चर्चमध्ये जाऊन पूजा करतात, यावेळी त्यांना आठवण करून दिली जाते की, निजामाने भद्राचलममध्ये प्राचीन रामाचे मंदिर बांधले होते. जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या शेख मीराचे आता लोकांकडून कौतुक केले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Shiv Sena : शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे 'धनुष्यबाणावर' दावा करु शकतात का? घटना काय सांगते...
- Maharashtra Political Crisis: Exclusive : शिंदेंच्या गटात 'अब तक 46', शिवसेनेची गळती काही थांबेना; नवीन फोटो व्हायरल