Covid-19 Symptoms in Kids : गेल्या दोन अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातले आहे. अलीकडे यातून थोडासा दिलासा मिळत असल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोवर मात केल्यानंतर देखील काही रूग्णांमध्ये दिर्घकाळापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसत आहेत.
कोरोनातून नीट झाल्यानंत रूग्णांध्ये थकवा आणि अशक्तपणासारखी लक्षणे दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या मुलांमध्ये कोरोनाची ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून आली आहेत. शिवाय वृद्धांमध्ये देखील अशा प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. डेन्मार्कमध्ये अभ्यासातून याबाबतचा खुलाला झाला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर 46 टक्के मुलांमध्ये दोन महिन्यांपर्यंत कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत.
संशोधकांनी अभ्यासादरम्यान डेन्मार्कमधील मुलांचा राष्ट्रीय-स्तरीय नमुना वापरला आणि संक्रमणाचा पूर्वीचा इतिहास असलेल्या मुलांच्या नियंत्रण गटाशी कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांसोबत एकत्रित केले. हे संशोधन द लॅन्सेट चाइल्ड अँड एडोलसेंट हेल्थ जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.
लॅन्सेटने केलेल्या अभ्यासानुसार, 0 ते 14 वर्षांतील 46 टक्के मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिर्घकाळापर्यंत कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर देथील जपळपास दोन महिने मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचे आढळून आले आहे. 0 ते तीन वर्षांपर्यंतच्या 40 टक्के मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिर्घकाळापर्यंत दिसत आहेत. तर चार ते 11 वर्षांपर्यंतच्या 38 टक्के मुलांमध्ये कोरोनाची दिर्घकालीन लक्षणे दिसत आहेत.
मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या कोरोना लक्षणांसह जीवनाची गुणवत्ता आणि शाळा किंवा डे केअरमधून अनुपस्थिती निश्चित करणे हा अभ्यासाचा एकंदर उद्देश होता. डेन्मार्कमधील कोपनहेगन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील प्रोफेसर सेलिना किकेनबोर्ग यांनी सांगितले की, सर्व मुलांवर साथीच्या आजाराच्या दीर्घकालीन परिणामांवर पुढील संशोधन महत्त्वाचे ठरेल.
संशोधनादरम्यान, शरीरावर पुरळ येणे आणि ओटीपोटात दुखणे ही लक्षणे सामान्यतः 0-3 वर्षांच्या मुलांमध्ये दिसून आली आहेत. तर 4-11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे आणि शरीरावर पुरळ उठणे अशा समस्या दिसून आल्या. याबरोबरच 12-14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये थकवा, लक्षात ठेवण्यास त्रास होणे किंवा लक्ष केंद्रित करणे ही सर्वात सामान्य लक्षणे आढळून आली.