एक्स्प्लोर

देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प

दिल्ली : देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांचे व्यवहार बंद असणार आहे. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दबातल करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून या नोटा रद्द होतील. तसंच जमा केलेल्या नोटांच्या बदल्यात दिवसाला 4000 रुपये काढता येणार आहेत. कुठे जमा करता येतील या नोटा? पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. चिंतेचं कारण नाही : पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. 10 नोव्हेंबरपासून ही मर्यादा वाढवण्यात येईल. ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील. रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील 72 तास म्हणजे 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे. दोन हजार रुपयांची नोट : दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
Praful Patel on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Yogi Adityanath: पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...
पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Mumbai Slums house: मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी धडकी भरवणारी बातमी, घरांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असल्यास बांधकाम पाडणार, बीएमसीची फायनल वॉर्निंग
मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी धडकी भरवणारी बातमी, घरांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असल्यास बांधकाम पाडणार, बीएमसीची फायनल वॉर्निंग
Embed widget