Assam Flood : आसाममध्ये पुरामुळे  परस्थिती गंभीर झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमधील 5.61 लाखांहून अधिक लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने 324 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.  आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार आत्तापर्यंत या परिस्थितीमुळे 30 जमांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पुरामुळे एका मुलासह आणखी दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 


याबाबत माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ((Himanta Biswa Sarma) म्हणाले की, आसामच्या सध्याच्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने 324 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी केली आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. या मदतीमुळे बाधित नागरिकांचे वेळेवर मदत आणि पुनर्वसन सुनिश्चित होईल असे सरमा म्हणाले.


मृतांची संख्या 30 वर पोहोचली


आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन अहवालानुसार, राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 30 झाली आहे. प्राधिकरणाने सांगितले की, कचार, दिमा हासाओ, हैलीकांडी, होजाई, कार्बी आंगलाँग, पश्चिम मोरीगाव आणि नौगाव जिल्ह्यांमध्ये 5 लाख 61 हजार 100 हून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 


नागाव जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे


आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, 66 हजार 836 पूरग्रस्त पाच जिल्ह्यांमध्ये आश्रय घेत आहेत. आसाममधील पुराचा सर्वाधिक फटका नागावला बसला आहे. तिथे 3.68 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचवेळी, कचर जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख लोक आणि मोरीगावमधील 41 हजाराहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. दिमा हासाओ मार्गे दक्षिण आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरामसाठी रेल्वे सेवा ईशान्य सीमा रेल्वेच्या लुमडिंग-बदरपूर विभागात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे अद्यापही स्थगित आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


महत्वाच्या बातम्या: