Floods situation in Assam : सध्या आसाममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पुराचा परिणाम शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरमधील काही भागांवर देखील झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ईशान्य भारतातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, मुसळधार पावसामुळे आसाम पुराच्या तडाख्यात सापडले आगहे. आसाममध्ये पुरामुळे आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 20 जिल्ह्यांतील चार लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. सततच्या पावसामुळे देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे रस्ते तसेच रेल्वे ट्रॅक वाहून गेले आहेत, त्यामुले अनेक शहरांचा संपर्क तुटला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, (ASDMA) 20 जिल्ह्यांमधील 1 लाख 97 हजार 248 वरुन बाधित लोकांची संख्या 4 लाख 3 हजा 352 वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस पुराची स्थिती गंभीर होत असल्याचे चित्र दिसत आहे.




आसाममध्ये आठ जणांचा मृत्यू 


आत्तापर्यंत आसाममध्ये सुमारे 700 गावे पाण्याखाली गेली आहेत. तिथे आतापर्यंत पुरामुळे आठ जाणांच्या  मृत्यूची नोंद झाली आहे. पुरामुळे अनेक रेल्वे स्थानके बंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रस्ते आणि पूल भूस्खलनामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटला आहे. कचार, दिमा हासाओ, होजाई, चराईदेव, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, बजाली, बक्सा, बिस्वनाथ आणि लखीमपूर या जिल्ह्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.


परीक्षा स्थगित


दरम्यान, या पुरामुळे आसाममध्ये इयत्ता 11वी च्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. आजपासून (18 मे) या परीक्षा सुरू होणार होत्या. परीक्षा आयोजित करणार्‍या आसाम उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेत त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व संस्थांच्या प्रमुखांना ही माहिती कळवली आहे. शनिवारपर्यंत होणार्‍या प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वात जास्त नुकसान झालेल्या दिमा हासाओ जिल्ह्यात, पृष्ठभागावरील दळणवळणात व्यत्यय आल्याने 1 जूनपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
72 मदत छावण्यांमध्ये हजारो लोकांनी घेतला आश्रय   


72 मदत छावण्यांमध्ये 33 हजार 300 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. आसामच्या जिल्हा प्रशासनाने 27 मदत वितरण केंद्रे उघडली आहेत. ईशान्येकडील बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.