Asaduddin Owaisi Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर विरोधकांकडून टीकेचं सत्र सुरु झाले. त्यातच आता एमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi ) यांनी रविवारी(28 मे) रोजी तेलंगणातील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा साधला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. असदुद्दीन यांनी म्हटलं की, 'तुम्ही पंतप्रधान आणि हिंदू पंडितांचा फोटो पाहिला, परंतु यामध्ये शिख गुरु, ख्रिश्चन धर्मगुरु आणि मुस्लिम धर्मगुरुंचा देखील समावेश करायला हवा होता.' एमआयएमचे प्रमुखअसदुद्दीन ओवैसी हे तेलंगणा दौऱ्यावर आहेत. 


त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधत म्हटलं की, 'या देशाचा फक्त एकच धर्म नाही.' पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'हा दिल्लीच्या सुलतानाचा राज्याभिषेक सोहळा वाटत होता.' या दौऱ्यादरम्यान असदुद्दीन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तेलंगणाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर देखील निशाणा साधला. 'त्यांना आमचं नाव घेऊन टीका करता येत नाही का?' असा सवाल करत अमित शाह आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीका केली. 


'लढाई संघ आणि भाजपविरोधात'


एमआयएमच्या नेत्यांनी तेलंगणातील जनतेला संबोधित करताना म्हटलं की, 'औवैसी यांचे नाव घेतल्यावर तुम्हाला ताकद मिळेल, त्यामुळे पोटभरेपर्यंत त्यांचे नाव घ्या.ट अमित शाह यांचे नाव घेत एमआयएम नेत्यांनी म्हटले की, 'अमित शाहा यांनी एमआयएमच्या शक्तीचा अंदाज आहे, त्यामुळे जोपर्यंत एमआयएम ताकदवान राहील सचिवालयावर भाजप त्यांचा झेंडा लावू शकत नाही.'  'तसेच संघाबरोबर देखील रस्त्यावर उभं राहून आम्ही लढत आहोत' असं म्हणत एमआयएमच्या नेत्यांनी संघावर निशाणा साधला आहे. 


असदुद्दीन यांनी म्हटलं की,'मी जनतेशी आणि पक्षातील लोकांशी बोलून ठरवेन की तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये किती जागांसाठी निवडणुक लढवायची?' तसेच 'नव्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच धर्माच्या लोकांना घेऊन गेले या गोष्टीचं दु:ख असल्याचं' ओवैसी यांनी त्यांच्या तेलंगणाच्या दौऱ्यादरम्यान म्हटलं. 


संसदेत कुराण वाचायला हवा होता - ओवैसी


  'संसदेत कुराणाचे वाचन देखील करायला हवे होते. तसेच तुमचं मन एवढं मोठं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत हेच सत्यमेव जयते आहे का?' असा सवाल ओवैसी यांनी केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


New Parliament Building: तुम्ही सांगत असलेला सेंगोलचा अर्थ आम्ही स्विकारू शकत नाही; कपिल सिब्बल यांनी थेटच सांगितलं