Petrol Diesel Rates: सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Price) अपडेट केल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथील किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दरराष्ट्रीय स्तरावर स्थिर आहेत.


कच्च्या तेलात चढ-उतार सुरूच आहेत. सध्या ते प्रति बॅरल 75 डॉलरच्या वर आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 77.59 डॉलर आणि WTI क्रूड प्रति बॅरल 73.41 डॉलरवर कायम आहे.


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर 


देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. त्यात बराच काळ बदल झालेला नाही. नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर व्यवहार करत आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.


Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 



  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 

  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 

  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर 


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).