ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) सोमवारी (29 मे) रोजी जीपीएस प्रणालीच्या सेवेमध्ये वाढ करण्यासाठी आधुनिक पिढीच्या आंतराळयानाचे (Satelite) प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून जीएसएलव्ही एफ- 12(GSLV-F12)या रॉकेटमधून एनवीएस-1 (NVS-1) या उपग्रहाने अंतराळात भरारी घेतली आहे. जी एस एल व्ही एफ 12 च्या माध्यमातून हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आलं आहे. या उपग्रहाचं वजन दोन हजार 332 किलो इतकं आहे


माहितीनुसार, दोन हजारांपेक्षा अधिक वजन असणाऱ्या एनवीएस-01 या उपग्रहामुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. 






चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार 


एनवीएस-1 या प्रणालीमुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. तसेच हा उपग्रह सीमेवर लक्ष ठेवण्यास देखील मदत करणार आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे पाकिस्तान आणि चीनला योग्य तो निरोप नक्की मिळेल यात शंका नाही. या दोन्ही देशांकडून सीमेवर सतत काहीतरी कुरघोडी करण्यात येत आहेत. 


 त्यामुळे आता एनवीएस-01 ((NVS-1)) या उपग्रहाच्या माध्यमातून सीमेवर या दोन्ही देशाकडून करण्यात येणाऱ्या कुरघोडींना आता चोख उत्तर देण्यास भारत आणखी सक्षम होऊ शकतो. कोणत्याही आपतकालीन परिस्थितीमध्ये इस्रोचे हा उपग्रह देशाच्या सुरक्षा संस्थांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे हि आधुनिक आणि नवी नेव्हिगेशन प्रणाली भारतासाठी आता महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


NAVIC म्हणजे काय?


इस्रोकडून विकसित करण्यात आलेली (NAVIC) ही स्वदेशी नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे. हा सात उपग्रहांचा समूह असून, अंतराळात ग्राऊंड स्टेशन म्हणून हे काम करेल. ही प्रणाली देशातील सामान्य नागरिकांपासून ते सैन्याच्या जवानांपर्यंत सर्वांना रणनिती ठरवण्यासाठी नेव्हिगेशन प्रणाली म्हणून काम करणार आहे. या प्रणालीला भारतातील एव्हिएशन क्षेत्रातून वाढणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक नेव्हिगेशनसह तयार करण्यात आले आहे. या उपग्रहामुळे भारत आणि आजूबाजूच्या जवळपास 1500 किलोमीटरचे क्षेत्र हे भारताच्या निरिक्षणाखाली येईल. या उपग्रहासोबत इस्रोने पहिल्यांदाच स्वदेशी स्वरुपातले रुबिडियम अणु घड्याळदेखील लाँच केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 


9 Years Of Modi Government: मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद