एक्स्प्लोर
सीतारमण तूर्तास संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणार नाहीत
तूर्तास निर्मला सीतारमण संरक्षण मंत्रीपदाचा भार सांभाळणार नाहीत. सध्या संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आहे.
नवी दिल्ली: देशाच्या पहिल्या फुलटाईम संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांची नियुक्ती झाली आहे. इंदिरा गांधींनंतर देशाच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला मंत्र्याच्या खांद्यावर आहे आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.
मात्र तूर्तास निर्मला सीतारमण संरक्षण मंत्रीपदाचा भार सांभाळणार नाहीत. सध्या संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आहे.
अरुण जेटली संरक्षण मंत्री म्हणून द्विपक्षीय चर्चेसाठी जपान दौऱ्यावर आहेत. ते जपान दौऱ्यावरुन परतल्यानंतर निर्मला सीतारमण संरक्षण पदाची धुरा सांभाळतील.
माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाल्याने, अरुण जेटलींकडे संरक्षणमंत्रीपदाचा भार आला.
जेटली रविवारी रात्रीच जपानला रवाना झाले. जपानमध्ये संरक्षण मुद्दयांबाबत त्यांची जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी चर्चा होणार आहे.
जपानला जाण्यापूर्वी जेटली म्हणाले, “नव्या संरक्षणमंत्र्यांनी जपानला जाणं योग्य ठरलं असतं, मात्र आजच (रविवारी) त्याच्यांकडे पदभार आला आणि ही बैठक पूर्वनियोजत आहे. त्यामुळे मलाच जावं लागत आहे”
दरम्यान, अरुण जेटली जपानवरुन परतल्यानंतर निर्मला सीतारमण संरक्षण मंत्रालयाचा भार स्वीकारतील.
संबंधित बातम्या
निर्मला सीतारमण गुगल सर्चमध्ये अव्वल, गोव्यात सर्वाधिक सर्च
देशाच्या नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची ओळख
1990 साली अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात!
केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली!
2019 साठी मोदींची नवी टीम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement