एक्स्प्लोर

नीट परीक्षेविरोधात लढणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीची आत्महत्या

नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचललं आहे.

चेन्नई : नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचललं आहे. 17 वर्षीय अनिता तामिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील कुझुमुर गावची रहिवासी असून, तिला बारावीमध्ये 98 टक्के मिळाले होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला वैद्यकीय क्षेत्रात करीअर करायचे होते. पण राज्य सरकारच्या एका अध्यादेशामुळे तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते. कारण गेल्या वर्षापर्यंत तामिळनाडूत मेडिकलसाठी प्रवेश 12 वीच्या मार्कांवर मिळत होता. मात्र राज्य सरकारने नीट परीक्षेच्या आधारेच मेडिकलसाठी प्रवेश देण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला. त्यामुळे राज्यात नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. पण या विरोधात अनितासह काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम सीबीएससी पॅटर्नवर अधारित असल्याने, ती परिक्षा अतिशय अवघड झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी अनिताने सुप्रीम कोर्टाकडे केली. पण सुप्रीम कोर्टानं 22 ऑगस्टच्या आपल्या निर्णयात नीट परीक्षेनुसार प्रवेश देण्याचा निर्णय दिला. त्यातच अनिताला नीटच्या परीक्षेत केवळ 86 टक्के मिळाल्यानं तिला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला नाही. अखेर नैराश्येपोटी तीनं हे टोकाचं पाऊल उचलंल. दरम्यान, अनिताने मेडिकल शिवाय इंजिनिअरिंगसाठीही प्रवेश परीक्षा दिली होती. त्यात तिला चांगले गुण मिळाले होते. विशेष म्हणजे, मद्रास इन्सटिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी तिला सहज प्रवेश मिळत होता. पण तिला वैद्यकीय क्षेत्रातच करीअर करायचे असल्याने, तिने इंजिनिअरिंग करणे टाळले. अनिताच्या आत्महत्येनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ पलानीस्वामी यांनी कुटुंबाला 7 लाखांची मदत जाहीर केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीच्या भारतातील फॉलोअर्सची संख्या किती? अभिजीत दीपकेंकडून आकडेवारी शेअर
कॉकरोच जनता पार्टीच्या भारतातील फॉलोअर्सची संख्या किती? अभिजीत दीपकेंकडून आकडेवारी शेअर
NEET UG 2026 : नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget