'देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी अन् काँग्रेसची सवय'; अमित शाह यांचा पलटवार
Amit Shah On Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अमित शाह यांनी निशाणा साधला आहे.
Amit Shah On Rahul Gandhi नवी दिल्ली: सध्या देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. महाराष्ट्रातही मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट अमेरिकेवरुन आरक्षणावर आपली भूमिका मांडली. योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपवण्याबद्दल विचार करेन. जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानावरुन देशभरात पडसाद उमटले आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधला आहे. देशाविरोधात बोलणे आणि देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय झाली आहे. मग ते जम्मू काश्मीरमध्ये जेएनकेसीच्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याचे समर्थन करणे असो, वा परदेशातील व्यासपीठांवर भारताविरोधात बोलणे. राहुल गांधींनी नेहमी भारताच्या सुरक्षेला आणि भावनांना ठेच पोहोचवली आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.
आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही- अमित शाह
भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात.राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, असं अमित शाह यांनी सांगितले. तसेच मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करु शकत नाही, असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे.
देशविरोधी बातें करना और देश को तोड़ने वाली ताकतों के साथ खड़े होना राहुल गाँधी और कांग्रेस पार्टी की आदत सी बन गई है। चाहे जम्मू-कश्मीर में JKNC के देशविरोधी और आरक्षण विरोधी एजेंडे का समर्थन करना हो, या फिर विदेशी मंचों पर भारत विरोधी बातें करनी हो, राहुल गाँधी ने देश की सुरक्षा…
— Amit Shah (@AmitShah) September 11, 2024
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केलं. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे, असं राहुल गांधी म्हणालेत. तसेच यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवलं जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचं पसरवलं जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
Jayant Patil: अजित पवार हे बारामती मधूनच निवडणूक लढतील; जयंत पाटील यांचा विश्वास, कारणही सांगितलं