एक्स्प्लोर
Advertisement
खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन
नवी दिल्ली : राज्याचे महसूलंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत दिल्लीमध्ये खलबतं सुरु आहे. पक्षाची भूमिका एकनाथ खडसेंना कळवा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिला. त्यानंतर गडकरी आणि खडसे यांच्यात फोनवर बातचीत झाली.
मात्र गडकरी आणि खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
खरतंर खडसेंच्या प्रकरणात अजूनपर्यंत नितीन गडकरींचं नाव कुठेच नव्हतं. गडकरी यांचं दिल्लीत वजन तर आहेच, शिवाय ते भाजपचे माजी अध्यक्षही आहेत. त्यामुळे खडसे प्रकरणाचा निर्णय गडकरींच्या मताशिवाय घेतला जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आज पक्षाध्यक्षांनी गडकरींना खडसेंशी चर्चा करण्याचे आदेश दिले.
कथित पीएची लाचखोरी, दाऊदच्या कॉललिस्टमधील खडसेंचा कथित नंबर, तसंच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण या आरोपांमुळे खडसेंना विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेने घेरलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून पक्षनेतृत्त्वाने यात हस्तक्षेप केला आहे.
इतकंच नाही तर काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद मोदींमध्ये जवळपास अर्धा तास गुप्त बैठक झाली होती. या बैठकीपूर्वी फडणवीस यांनी खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसदर्भातला अहवाल अमित शाहांकडे सोपवल्याचं कळतं.
खडसेंवरील आरोप
* कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक
* जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप
* दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा
* भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद
संबंधित बातम्या
'तो' अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे
खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील
सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका
खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण
विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला
एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना
एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?
खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला
मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता
ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण
..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे
खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील
‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’
खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण
खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?
दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement