मुंबई : आपल्याकडे लसींचा किती साठा आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी काय आहेत हे न पाहता, सरकारने वेगवेगळ्या वयोगटासाठी लसीकरण सुरु केलं आहे असा आरोप पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केलाय. देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्याचं जाहीर केलं असताना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरणातील दुसऱ्या टप्प्यातील 45 वर्षावरील लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागतीय अशी परिस्थिती निर्माण झालीय. 


देशात आधीच कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे, त्यावर भर म्हणजे केंद्र सरकारने आपल्याकडे लसींचा साठा किती प्रमाणात आहे याची खातरजमा न करता आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या शिफारसींकडे दुर्लक्ष करुन विविध वयोगटातील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम पुढे रेटला असा आरोप सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केलाय.


 




सीरम इन्स्टिट्यूट ही देशातील प्रमुख लस निर्मिती कंपनी आहे. या कंपनीकडून कोविशिल्ड ही लस निर्मिती करण्यात येत आहे. आता या संस्थेच्या कार्यकारी संचालकांनीच सरकारवर एक प्रकारचा आरोप केल्याचं पहायला मिळतंय. 


देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला. पहिल्या टप्प्यात 60 वर्षावरील लोकांचे तसेच गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लोकांच्या लसीकरण सुरु करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. देशात 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आणि यामध्ये 18 ते 45 वर्षांमधील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असं जाहीर केलं. पण यामध्ये अनेक राज्यांनी भागच घेतला नाही कारण त्यांच्याकडे लसींचा तुटवडा होता. 


लसींच्या तुटवड्यामुळे आधी कोणाला लस द्यायची असा प्रश्न अनेक राज्यांपुढे निर्माण झाला. कारण एकीकडे 18 वर्षावरील लोकांना लस देत असताना दुसरीकडे 45 वर्षावरील लोकांना लस तुडवडा होत होता. भारतातील सर्व प्रौढांना या वर्षीच्या शेवटीपर्यंत लस मिळेल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. 


महत्वाच्या बातम्या :