(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FogCare: एअर इंडियाची भन्नाट सर्व्हिस, फ्लाइट कॅन्सल अथवा रिशेड्यूल करा मोफत
Air India FogCare Initiative: एअर इंडियाने 'फॉगकेअर' नावाची नवीन सर्व्हिस सुरु केली आहे. नेमकी काय आहे ही सर्व्हिस आणि ग्राहकांना याचा कसा फायदा मिळेल, हे जाणून घेऊ...
Air India FogCare Initiative: हिवाळ्यात दाट धुक्यांमुळे दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये दृश्यमानता कमी होते. अशा परिस्थितीत अनेकवेळा विमान उशीर उड्डाण करतात किंवा रद्द केले जातात. ही समस्या लक्षात घेऊन एअर इंडियाने 'फॉगकेअर' (Air India FogCare Service) नावाची सर्व्हिस सुरू केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना धुक्यामुळे प्रभावित झालेल्या फ्लाइटचे वेळापत्रक बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा पर्याय दिला जाईल. एअर इंडियाने (Air India) सुरू केलेल्या या नव्या सर्व्हिस अंतर्गत प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Air India Flight Reschedule : फ्लाइट कॅन्सल अथवा रिशेड्यूल करता येईल, तेही मोफत
एअर इंडियाने (Air India) हिवाळ्यात धुक्यामुळे फ्लाइट उड्डाण करण्यास होणार उशीर आणि रद्द केल्यामुळे प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेऊन "फॉगकेअर" (Air India FogCare Service) सुरू केले आहे. ज्या अंतर्गत एअर इंडिया ग्राहकांना धुक्यामुळे प्रभावित होणारी फ्लाइट कोणतेही अतिरिक्त भाडे न घेता कॅन्सल अथवा रिशेड्यूल करण्याचा पर्याय देईल.
Delhi Airport : दिल्ली विमानतळावरून 'फॉगकेअर' ( FogCare) सर्व्हिसची होणार सुरुवात
'फॉगकेअर' (Air India FogCare Service) सर्व्हिसची सुरुवात दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाइटपासून सुरू होईल. धुक्याची परिस्थिती जी सहसा हिवाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी उद्भवते, ज्यामुळे उड्डाण सेवा प्रभावित होतात. ग्राहकांना याचा त्रास होऊ नये म्हणून एअर इंडियाने (Air India) पुढाकार घेऊन ही सर्व्हिस सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.
Air India Customer Service : विमान कंपनी प्रवाशांशी करणार संपर्क
एअरलाइन (Air India) प्रवाशांशी संपर्क साधेल आणि त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांची प्रभावित उड्डाणे कॅन्सल अथवा रिशेड्यूल करण्याचा पर्याय देईल. बाधित फ्लाइटचे प्रवासी विमानतळावर न जाता, लांब रांगेत उभे न राहता या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, शनिवारी सकाळी दाट धुक्यानी दिल्लीत दृश्यमानता 100 मीटरपर्यंत कमी झाली होती. आयएमडीनुसार (IMD ), दिल्लीतील वेधशाळेत किमान तापमान 5.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. यातच पंजाब, उत्तर राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर झाल्याचं दिसून आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: