एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' कारणांमुळे आलोक वर्मांवर कारवाई, माजी न्या. काटजू यांची फेसबुक पोस्ट
"न्या. सिकरी यांच्याशी बातचीत करुन मी माहिती घेतली. तसेच ही माहिती फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी त्यांची परवानगीही घेतली", असे काटजू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.
नवी दिल्ली : सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांची मोदी सरकारकडून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांच्या सिलेक्ट कमिटीकडून 2-1 बहुमताने निर्णय घेण्यात आला. सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी म्हणून न्यायमूर्ती सिकरी या बैठकीला उपस्थित होते.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीली आहे. "आलोक वर्मा यांना पदावरून हटवल्यानंतर याविषयी अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला. आलोक वर्मा यांना आपली बाजू मांडण्याची संधी का देण्यात आली नाही? असा अनेकांचा प्रश्न होता. त्यामुळे न्या. सिकरी यांच्याशी बातचीत करुन मी माहिती घेतली. तसेच ही माहिती फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी त्यांची परवानगीही घेतली", असे काटजू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.
न्या. सिकरी यांनी सांगितलेले सहा मुद्दे काटजू यांनी या पोस्टमध्ये मांडले आहेत. 'आलोक वर्मा यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी पुर्ण होण्यापूर्वी त्यांना सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात यावे. तसेच श्रेणीनूसार दुसऱ्या पदावर त्यांची बदली करण्यात यावी असे न्या. सिकरी यांचे मत होते. वर्मा यांना निलंबित करण्यात आल्याचे काही लोक म्हणत आहेत. परंतू त्याना निलंबित करण्यात आलेले नसून त्याच श्रेणीच्या दुसऱ्या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. सुनावणी न करता कोणालाही पदावरून हटवलं जाऊ शकत नाही. परंतू निलंबित केलं जाऊ शकतं. निलंबित करुन चौकशी सुरु ठेवणं ही सर्वसाधारण बाब आहे', असे या पोस्टमध्ये लिहीले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement