एक्स्प्लोर

सुषमा स्वराज यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली, मोदी, गडकरींसह शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे भावूक

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं. रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. सुषमा स्वराज्य यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. त्या असामान्य राजकीय नेत्या होत्या. त्यांची भाषणशैली खूप ओघवती होती. त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या.  आमची मैत्री पक्षीय राजकारणापलीकडे होती, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील तेजस्वी अध्यायाचा अस्त झाला आहे. त्यांनी जनहितासाठी आणि गरिबांसाठी आयुष्यभर काम केलं. त्या उत्तम वक्ता, उत्तम प्रशासक होत्या. प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी गेल्या पाच वर्षात माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी अविश्रांत काम केलं. लोकांना न्याय देण्यासाठी त्या सदैव तत्पर असत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झालं. देशाने आपली लाडकी लेक गमावली आहे. धाडस आणि निष्ठेचं त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश कदापी विसरणार नाही, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या आयुष्यात विक्रम करण्याचाच विक्रम केला आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. देशातील सर्वात तरुण महिला राजकारणी, आमदार, दोन वेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्ष नेत्या आणि परराष्ट्र मंत्री!हे सारं त्यांनी एकाच आयुष्यात साध्य केलं. त्यांच्या निधनामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालं असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या निधनाने हिंदुस्थानी राजकारणातून एका तेजस्वी युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुषमाजींच्या जाण्याने केवळ देश आणि भारतीय जनता पक्षाचीच नव्हे, तर ठाकरे परिवाराचीही अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी अनेकदा शिवसेना आणि भाजपमधील प्रेमाचा दुवा म्हणून काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुषमाजी यांच्या नात्यात एक आत्मीयता होती. बाळासाहेबांच्या जाण्यानंतरही हे नातं कायम राहिलं. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि नेतृत्वात तेज होतं तसंच मांगल्यही होतं. मी संपूर्ण शिवसेना आणि ठाकरे परिवारातर्फे त्यांना श्रद्धासुमनं अर्पण करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजप आणि भारतीय राजकारणाची अपरिमीत हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. सुषमा स्वराज यांचे अचानक निधन झाल्याचे एकून अत्यंत दुःख झाले. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली. त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या, हिंदी भाषेवर तर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व होते. विरोधी पक्ष नेता असताना सत्ता पक्षातील नेत्यांशी त्याचे सौहार्दाचे संबंध होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट केली. सुषमा स्वराज यांच्याकडून मला मोठ्या बहिणीचे प्रेम मिळाले अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुषमा स्वराज यांचे निधन हा खूप मोठा धक्का आहे. एक उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ता, दयाशील आणि लोकप्रिय नेत्या म्हणून त्या कायम लक्षात राहतील. आपल्या जीवनात संघर्ष आणि अथक परिश्रम करत यशाची शिखरं त्यांनी गाठली होती, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे न भरून निघणारं नुकसान झालं आहे. संकटात सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी त्या धावून जायच्या! अगदी एक नर्स असेल तरी. त्यांचे योगदान भारतीय नेहमी लक्षात ठेवतील, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget