News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

दहा रुपयाची सर्व नाणी वैध : आरबीआय

काही व्यापारी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रिझर्व बँकेकडे आल्या होत्या. त्यानंतर याबाबत रिझर्व बँकेने 10 रुपयाची 14 डिझाइनची सर्व नाणी वैध असल्याचं स्पष्ट केलं आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : 10 रुपयांच्या सर्व नाण्यांबाबत आज (बुधवार) रिझर्व बँकेने मोठी घोषणा केली आहे. काही व्यापारी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रिझर्व बँकेकडे आल्या होत्या. त्यानंतर याबाबत रिझर्व बँकेने 10 रुपयाची 14 डिझाइनची सर्व नाणी वैध असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंबंधी रिझर्व बँकेने एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'रिझर्व बँकेच्या असं निदर्शनास आलं आहे की, अनेक ठिकाणी काही लोक किंवा व्यापारी 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नाही. पण आतापर्यंत 10 रुपयांची जी 14 वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आहेत ती सर्व वैध आहेत.' '10 रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो.' असंही रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे. ही सर्व नाणी वेगवेगळ्या फीचर्समध्ये आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विविध पैलू प्रदर्शित होतात. त्यामुळे वेळोवेळी ही वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आणली गेली आहेत. असं रिझर्व बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच सर्व बँकांनी 10 रुपयांची नाणी स्वीकारावीत असे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत.
Published at : 17 Jan 2018 11:42 PM (IST) Tags: coin नाणी reserve bank of india आरबीआय

आणखी महत्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Amit Shah Exclusive VIDEO : नरेंद्र मोदी हेच 2029 सालचा भाजपचा चेहरा असणार; अमित शाहांनी भाजपचा प्लॅन सांगितला

Amit Shah Exclusive VIDEO : नरेंद्र मोदी हेच 2029 सालचा भाजपचा चेहरा असणार; अमित शाहांनी भाजपचा प्लॅन सांगितला

EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?

EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?

CBSE announces dates for 2025 : CBSE कडून येत्या शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

CBSE announces dates for 2025 : CBSE कडून येत्या शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

टॉप न्यूज़

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण