एक्स्प्लोर
हनीप्रीतचा शोध सुरुच, बिहारमधील सात जिल्ह्यात अलर्ट जारी
हनीप्रीतचा शोध घेण्यासाठी आता नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिहारच्या सात जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पटना : बलात्कारी बाबा राम रहीमच्या सर्वात जवळची व्यक्ती समजली जाणारी हनीप्रीत गेले अनेक दिवसांपासून गायब आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. पण आतापर्यंत तरी त्यांना यश आलेलं नाही. आता अशी माहिती मिळते आहे की, हनीप्रीतविषयी आता हरियाणा पोलिसांनी बिहार पोलिसांना संपर्क साधला आहे.
सुत्रांच्या मते, बिहारचे जे सात जिल्हे नेपाळ सीमेला लागून आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर बिहार पोलिसांनी देखील कसून तपास सुरु केला आहे. तसेच हनीप्रीतचे पोस्टरही जागोजागी लावण्यात आले आहे. सुत्रांच्या मते, हनीप्रीत बिहारमार्गे नेपाळला पळून गेली आहे किंवा ती पळून जाण्याच्या तयारीत आहे.
बिहारमधील या जिल्ह्यांमध्ये गाड्यांचीही तपासणी सुरु आहे. तर या सात जिल्ह्यांमधील हॉटेलमध्येही पोलीस हनीप्रीतचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापही ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
संबंधित बातम्या :
हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement