एक्स्प्लोर

Air India Plane Crash : 'आम्ही अगोदरचं इशारा दिलेला' ड्रीमलाइनर दुर्घटनेबाबत दोन केबिन क्रू मेंबर्सचा मोठा दावा,पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

Air India Plane Crash : एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक येथे जाणारं विमान 12 जूनला दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ते बोईंगचं ड्रीमलाइनर 787/8 हे विमान होतं.

मुंबई : 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाची फ्लाईट AI 171 (ड्रीमलाइनर एअरक्राफ्ट B787/7 सिरीज) च्या अपघातात जीव गमावलेलल्या प्रवासी, कॉकपिट आणि केबिन क्रूच्या कुटुंबाप्रती एविएशन इंडस्ट्री इम्प्लॉइज गिल्डनं संवेदना व्यक्त केल्या आहेत. एविएशन इंडस्ट्री इम्प्लॉइज गिल्डचे जनरल सेक्रेटरी  जॉर्ज इब्राहिम यांनी एबीपी न्यूज सोबत बोलताना म्हटलं की एअर इंडियामध्ये काम करणारे क्रू मेंबर्स जर फ्लाईटच्या तांत्रिक समस्या सांगत असतील तर त्यावर काम केलं जातं. ते म्हणाले की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे आणि आमची आशा ही आहे की त्या पत्राची दखल घेतली जाईल. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरुन सत्य समोर येईल, असं ते म्हणाले.  

जॉर्ज इब्राहिम पुढं म्हणाले की, आम्हाला याद्वारे एक बाब रेकॉर्डवर आणायची आहे ती म्हणजे ही दुर्घटना होणार होती, याचा इशारा पहिल्यांदा दिला होता. एअर इंडिया लिमिटेड आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनकडे ड्रीमलाइनर B787/8 सिरीज विमानातील तांत्रिक समस्या आणि सुरक्षे संदर्भातील मुद्दे वारंवार मांडले होते. मात्र, आमच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, आमचा आवाज दाबला गेला, गांभीर्यानं घेतला गेला नाही, असं इब्राहिम म्हणाले.  

दोन वरिष्ठ केबिन क्रू सदस्य आणि इतर एक ड्रीमलाइनर (VT-ANQ) संदर्भातील 14 मे 2024 च्या एका गंभीर घटनेबाबत सत्य बोलले तेव्हा त्यांना खोट्या आरोपात फसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि अखेर सेवेतून काढण्यात आलं. पायलट आणि केबिन इनचार्ज द्वारे सुरुवातीला दुजोरा दिला होता की  मुंबई लंडन फ्लाइट AI129 चा दरवाजा L4 मॅन्युअल मोडमध्ये होता. ज्यामुळं स्लाइड राफ्ट खुला झाला होता. आम्ही हे सत्य मांडलं होतं मात्र उच्च अधिकाऱ्यांनी आमच्यावर जबाब बदलण्यासाठी दबाव टाकलेला, दोघांनी इन्कार केला तेव्हा त्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं.  

या घटनेस अनेक साक्षीदार होते, ज्यामध्ये कॅप्टन देखीलचा समावेश होता. मात्र, जाणीवपूर्वक त्याचा जबाब नोंदवला गेला नाही. यातून स्पष्ट होतं की तांत्रिक उणिवा लपवण्याचा प्रयत्न केला गेला. या समस्या वेळेवर ठीक केल्या असत्या तर 12 जूनची दुर्घटना घडली नसती.  

यानंतर  डीजीसीएकडे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. मात्र, हैराण करण्यासाठी गोष्ट म्हणजे या गंभीर प्रकरणात पूर्ण चौकशी ऐवजी अनौपचारिक चर्चेचं आश्वासन देण्यात आलं.आमच्या खर्चानं 6 सप्टेंबर 2024 रोजी डीजीसीए समोर पुरावे मांडले होते. मात्र, 9 महिन्यानंतर कोणताही रिपोर्ट समोर आलेला नाही, असं क्रू मेंबर्सच्यावतीनं सांगण्यात आलं 

डीजीसीएवर विश्वास ठेवणं बरोबर होतं का असा प्रश्न पडत असल्याचं ते म्हणाले. आमचा हेतू कुणाची प्रतिमा खराब करण्याचा नव्हता, प्रवाशांच्या सुरक्षेता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देणं हा होता. आम्ही जवळपास 20 वर्ष इमानदारीनं आणि समर्पण भावनेनं एअर इंडियाची सेवा केली आहे. या पत्रासह आम्ही त्या सर्व कागदपत्रं जोडली आहेत. ज्यामध्ये ड्रीमलाइनर विमानाच्या यापूर्वीच्या घटनांची माहिती आहे. आमची अखेरची आशा ही आहे की न्याय मिळावा आणि सुरक्षेसंदर्भातील मुद्दे गांभीर्यानं घ्यावेत, असं क्रू मेंबर्सच्यावतीनं सांगण्यात आलं.

सध्या हे प्रकरण केंद्रीय सतर्कता आयोगापुढं आहे. या प्रकरणाचा क्रमांक  65682/2024 दिनांक 22/07/2024 असा आहे. एअर इंडियाच्या दोन क्रू मेंबर्स पैकी एकानं 5 वर्ष VVIP फ्लाइटसमध्ये सेवा दिली आहे. 100 पेक्षा अधिक VVIP सेवा दिल्या आहेत. यापैकी एका क्रू मेंबरला एअर इंडियाचा सर्वोत्कृष्ट क्रू मेंबर्स म्हटलं जायचं.

दरम्यान, दोन्ही क्रू मेंबर्स भीतीपोटी कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत.  नोकरी नसल्यानं होणाऱ्या समस्यांचा सामना करत आहेत. एका क्रू मेंबरच्या पत्नीनं नोकरी सुरु करुन घरचा खर्च भागवणं सुरु केलं आहे.  

दरम्यान, या प्रकरणी एअर इंडियाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून अद्याप त्यांची बाजू समजलेली नाही. ती समजल्यानंतर या स्टोरीत मांडली जाईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget