Indian Air Force Unveils New Flag : आज भारतीय हवाई दल (Indian Air Force) चा 91 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने आज वायू दलाला नवा ध्वज मिळाला आहे. भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. 72 वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. आज वायुसेना दिनानिमित्त प्रयागराजमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आलं आहे.
भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज
91 व्या स्थापनेच्या मुहूर्तावर भारतीय हवाई दलाच्या वेगळ्या अध्यायाला सुरुवात झाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, आज भारतीय हवाई दलाला नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. 72 वर्षांनंतर वायू दलाच्या झेंड्यामध्ये बदल करण्यात आला आहे. हवाई दलाच्या 91 व्या वर्धापनदिनानिमित्त आज, रविवारी भारतीय हवाई दलाला नवा ध्वज मिळाला आहे.
हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभाची भर
हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान नवीन ध्वजाचं अनावरण केलं. नवीन ध्वजावर उजव्या कोपर्यात भारतीय वायुसेनेचे चिन्ह असून त्यामध्ये त्यात हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे. अशा नव्या रुपात आता भारतीय वायू दलाचा नवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आला.
भारतीय हवाई दल दिन
8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय वायू सेना दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलांपैकी एक आहे. भारतीय वायु सेनेच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं धाडस करत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या लष्करी सामर्थ्यात आणखी वाढ झाली आहे.
भारतीय वायू दलाची स्थापना आणि इतिहास
भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून केली होती. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलाचे प्रमुख होते.
महत्वाच्या इतर बातम्या :