Indian Air Force Day: भारतीय हवाई दलाचा आज 91वा स्थापना दिवस; प्रयागराजमध्ये रंगणार दिमाखदार एअर शो
Indian Air Force Day: यंदा भारत 91वा वायुसेना दिवस साजरा करत आहे. भारतीय हवाई दल हे जगभरातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती, तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 'भारतीय हवाई दल दिवस' म्हणून साजरा केला जातो.
91व्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रयागराजमध्ये हवाई दलाची परेड आणि एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी शुक्रवारी संपूर्ण कवायतीची तालीम करण्यात आली.
हवाई दलाच्या तालीमचा हा कार्यक्रम सेंट्रल एअर कमांडचे मुख्यालय बमरौली येथे आयोजित करण्यात आला होता, जिथे भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांनी परेडमध्ये शौर्य दाखवलं.
रिहर्सल दरम्यान लष्कराची जहाजं आणि हेलिकॉप्टरने हवेत जोरदार सलामी दिली.
या वेळी या कार्यक्रमाची थीम “IAF – Airpower Beyond Boundaries” आहे.
भारतीय सैन्याच्या देशभरातील हवाई दलाच्या लढाऊ विमानांद्वारे प्रयागराजमध्ये दुपारी दीड नंतर प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत.
भारतीय वायुसेनेद्वारे आज हवाई शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.
ही काही रंगीत तालीम दरम्यानची दृश्यं आहेत.
भारतीय वायुसेनेच्या या एअर शोमध्ये विंटेज एअरक्राफ्ट टायगर मॉथ, हार्बट ट्रेनर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट C 130, IL 78, चेतक हेलिकॉप्टर आणि रुद्र हेलिकॉप्टर पाहायला मिळणार आहेत.
भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान तेजस हे स्वदेशी बनावटीचं लोकप्रिय विमान देखील एअर शोदरम्यान पाहायला मिळणार आहे.
कारगिलमध्ये शत्रूच्या सहा विमानांना वाचवणारं मिराज 2000 देखील आकाशात आपले पराक्रम दाखवेल.