Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) सुसाट प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. आता वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच (Sleeper Coach) उपलब्ध करण्यात येणार आहेत. वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोचची (Vande Bharat Express Sleeper Coach) डिझाईन राजधानी आणि इतर एक्सप्रेस ट्रेनपेक्षा हटके असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास आणखी आरामदायी स्लीपर कोचने लवकरच प्रवास करता येणार आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोचची सुविधा नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 


'वंदे भारत'चा प्रवास आणखी आरामदायी होणार


वंदे भारत ट्रेनचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त बैठी आसन व्यवस्था आहे, परंतु आता लवकरच या ट्रेनमध्ये स्लीपर कोचची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी, 3 ऑक्टोबरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर एक्स (Twitter X) वर वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असणार आहेत, ज्यामध्ये 11 डबे 3 टायर कोच, 4 डबे 2 टायर कोच आणि 1 फर्स्ट टायर कोच असतील.


'वंदे भारत'च्या स्लीपर ट्रेनची झलक


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वंदे भारत स्लीपर ट्रेन  2024 च्या सुरुवातीला येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये टी-टियर आणि थ्री-टियर पर्याय उपलब्ध असतील. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये या आरामदायी प्रवासाची तुम्हाला कल्पना येईल. स्लीपर बर्थची रचना राजधानी किंवा इतर प्रीमियम एक्सप्रेस गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनचे फोटो समोर आले आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेन आतून कशी दिसते ते पाहा.






पहिली वंदे भारत ट्रेन 4 वर्षांपूर्वी धावली


देशाच्या विविध भागात धावत असलेल्या वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Express) चार वर्षे पूर्ण झाली आहेत. नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यानच्या पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली होती. पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. वंदे भारत ट्रेन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केली जाते. वंदे भारत ट्रेन 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा महत्वाचा भाग आहे.


सर्वसामान्यांसाठीही धावणार वंदे भारत


सध्या देशभरात धावत असलेल्या वंदे भारत ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांसाठी परवडणारा नाही. त्यामुळेच आता लवकरच देशातील सर्वसामान्यांसाठी 'वंदे साधरण ट्रेन' सुरू होणार आहे. याशिवाय 'वंदे मेट्रो' आणि 'स्लीपर वंदे भारत ट्रेन' सुरू करण्यात येणार आहेत.