एक्स्प्लोर
'अम्मा'च्या फोटोसह पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!

चेन्नई : जे जयललिता यांच्या निधनाची घोषणा होताच ओ. पनीरसेल्वम यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही उरकला. शपथविधी दरम्यान पन्नीरसेल्वम यांच्या हातात जयललितांचा फोटो होता. पन्नीरसेल्वम यांच्यासह 21 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
जयललिता यांना रविवारी रात्री कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे रविवारी रात्री अपोलो रुग्णालयातच तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठकही घेण्यात आली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाही करण्यात आली होती.
पनीरसेल्वम हे जयललिता यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. जयललिता यांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात आलं होतं, तेव्हा मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. शपथविधीच्या कार्यक्रमात जयललितांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले होते.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन
जयललिता यांच्यानंतर ओ.पन्नीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पन्नीररसेल्वम हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.
जयललिता यांना रविवारी रात्री कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे रविवारी रात्री अपोलो रुग्णालयातच तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठकही घेण्यात आली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाही करण्यात आली होती. जयललितांबाबत चुकीचं वृत्त देणाऱ्या 'थंथी' चॅनेलवर दगडफेक
एआयडीएमकेच्या मुख्यालयात आमदारांच्या गटाने ओ पन्नीरसेल्वम यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली. जयललिता यांचे राजकीय वासरदार म्हणून शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्यामध्ये चुरस होती. अखेर पक्षाने ओ पन्नीरसेल्वम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
पनीरसेल्वम हे जयललिता यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. जयललिता यांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात आलं होतं, तेव्हा मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. शपथविधीच्या कार्यक्रमात जयललितांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले होते. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक























