एक्स्प्लोर

आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात पुन्हा नवं काहीतरी करणार आहेत. अर्थसंकल्पाची तारीख बदलल्यानतंर आता त्यांची नजर आर्थिक वर्ष बदलण्यावर आहे. रविवारी झालेल्या नीती आयोगाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा मुद्दा लावून धरला. आर्थिक वर्ष बदलण्याचा अर्थ काय? सध्याचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत आहे. तुम्ही जो आयकर भरता, कंपन्या त्यांचे निकाल घोषित करतात किंवा सरकारचा अर्थसंकल्प बनतो त्या सगळ्याचा कालावधी 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत असतो. पण आर्थिक वर्ष बदलल्याने ही तारीख 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर होईल. तर अर्थसंकल्प सादर करण्याचा महिना फेब्रुवारीऐवजी नोव्हेंबर होईल. आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय? आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा हा विकासकामांना होईल. विकासासाठी योग्य वेळेत पैसा पोहोचेल. उदाहरणार्थ, एक पूल बनवायचा असेल तर त्यासाठी फेब्रुवारीमध्ये बजेट सादर होणार. पैसा मिळण्याची सुरुवात 1 एप्रिलनंतर होईल. यानंतर कंत्राटाची प्रक्रिया सुरु होता होता जून महिना उजाडेल. जून महिना म्हणजे पावसाळ्याचा. म्हणजे तेव्हा वेळ असेल पण पैसा नसेल आणि पैसा नसेल तर विकासाचं काम रखडतं. मग मान्सून संपल्यानंतर सरकारी यंत्रणा बजेटचा पैसा खर्च करण्याच्या लगबगीत असते. तर नव्या योजनेत नोव्हेंबरमध्ये बजेट सादर होईल. 1 जानेवारीला पैसा मिळेल आणि पुढील एक-दोन महिन्यात विकासकामांना सुरुवात होईल. आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय? आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर? देशाची 58 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या महिन्यात जर दुष्काळ पडला, तर सरकारला मदतीसाठी फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागते. नव्या योजनेत सरकार नोव्हेंबरमध्येच अर्थसंकल्प सादर करु शकतं. 150 वर्षांपूर्वी 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष मानण्याची सुरुवात जगभरातील बहुतांश देशांचं आर्थिक वर्ष आणि कॅलेंडरचं वर्ष एकच आहे. आर्थिक वर्ष बदलल्यामुळे भारतीय निर्यातदारांना आणि आयातदारांना हिशेब ठेवण्यास सोपं होईल. याबाबत शंकर आचार्य समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. देशात 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष मानण्याची सुरुवात 150 वर्षांपूर्वी 1867 मध्ये झाली होती. 1984 मध्येही आर्थिक वर्ष बदलण्याचा विचार झाला होता. पण आता नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्याचा उल्लेख करत स्पष्ट केलं की, सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती

Embed widget