एक्स्प्लोर

Gautam Adani: 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; अदानी यांचा विश्वास

Gautam Adani: भारताची अर्थव्यवस्था ही 2030 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि 2050 पर्यंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी म्हटले.

Gautam Adani:  2030 च्या अखेरीस भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल असा विश्वास अदानी समूहाचे (Adani Group) संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी शनिवारी केला. भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट होऊन 2050 पर्यंत जगातील दुसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.  

मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरु असलेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटट्समध्ये (World Congress of Accountants 2022)  "India's Path to an Economic Superpower" या विषयावर भाषण करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, आपण एका वेगळ्या परिस्थितीत या ठिकाणी एकत्र आलो आहोत. कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्ध, हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने, महागडी होणारी वीज आणि अभूतपूर्व महागाई यामुळे जागतिक नेतृत्वासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील समीकरणे बदलली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

गौतम अदानी यांनी म्हटले की, एकेकाळी वसाहतवाद्यांनी चिरडेला भारत देश आज लक्षणीय विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 1947 नंतर भारतात लोकशाही व्यवस्था टिकणार नाही, असे म्हटले जात होते. लोकशाही आणि देशातील विविधतेशी कोणतीही तडजोड न करता एक उच्च उत्पन्न असलेले राष्ट्र म्हणून भारत उदयास येत आहे. अदानी यांनी पुढे म्हटले की, 2030 पूर्वी आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू आणि त्यानंतर 2050 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अदानी यांनी म्हटले की, 2050 मध्ये भारताचे सरासरी वय फक्त 38 वर्षे असेल. या कालावधीत भारताची लोकसंख्या 15 टक्क्यांनी वाढून 1.6 अब्ज होईल. परंतु दरडोई उत्पन्नात 700 टक्क्यांपेक्षा अधिक वाढून ते अंदाजे 16,000 डॉलर होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. एवढी क्रयशक्ती असलेल्या मध्यमवर्गाच्या वाढीमुळे मागणीत अभूतपूर्व वाढ होईल. त्यामुळे खाजगी आणि सरकारी खर्चात वाढ होईल. तसेच थेट परकीय गुंतवणुकीचे सर्वोच्च स्तर गाठला जाईल, असेही त्यांनी म्हटले. चालू वर्षात भारताने 15 टक्क्यांच्या वाढीसह 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक परदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) सार्वकालिक उच्चांक नोंदवण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण होते. 
भारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ 2000 पासून 20 पटीने वाढला आहे आणि 2050 पर्यंत तो 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत (१ लाख कोटी डॉलर) पोहोचेल, अशी माझी अपेक्षा असल्याचे अदानी यांनी म्हटले. 

वर्ष 2021 मध्ये भारतातील युनिकॉर्न निर्मितीचा वेग हा जगातील सर्वात वेगवान ठरला असल्याचे त्यांनी म्हटले. वर्ष 2021 मध्ये भारतात दर 9 दिवसांनी एक युनिकॉर्न घडला असल्याचे दिसून आले. भारताच्या अंतर्गत मागणीमुळे थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होते आणि तयार होत असलेल्या स्टार्ट-अप्स संख्येमुळेही उद्यम भांडवल गुंतवणुकीत वाढ होईल, असेही त्यांनी म्हटले. येणाऱ्या काळात भारतात विजेची मागणी वाढणार आहे. पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे वर्ष २०५० पर्यंत भारत हा केवळ हरित-ऊर्जा क्षेत्रातील निर्यातदार होऊ शकेल. यामुळे कोणत्याही प्रक्रियेच्या सूक्ष्म आकाराला गती देण्यासाठी आवश्यक अशी विकेंद्रित वीजनिर्मितीदेखील सहज शक्य होईल. यामुळे सूक्ष्म-उत्पादन, सूक्ष्म-कृषी, सूक्ष्म-पाणी, सूक्ष्म-बँकिंग, सूक्ष्म-आरोग्य सेवा, सूक्ष्म-शिक्षण - भारताच्या ग्रामीण लोकसंख्येच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी सक्षम होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget